Ahmednagar News : विद्यार्थ्यांना दिलासा! नगरमध्ये पुणे विद्यापीठ उपकेंद्र; नवीन इमारतीचे रविवारी उद्घाटन

Ahmednagar News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे (Ahmednagar News) उद्घाटन होणार आहे. उद्या रविवार (3 मार्च) बाबुर्डी घुमट येथील नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. राजेंद्र विखे, उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.

जवळपास 18 हजार चौरस फूट परिसरात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीमुळे जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या इमारतीत विद्यार्थी सुविधा केंद्रही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक कामासाठी प्रत्येक वेळी पुणे कॅम्पसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. या कक्षामार्फत आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्विकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्विकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाणार आहे.

Ahmednagar News

याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी प्रशिक्षण वर्गही येथे भरवण्यात येणार आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून एक हजार विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी प्लेसमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या उपकेंद्रात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकी तीस कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य, प्रा. डॉ. संगीता जगताप, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. डॉ. सुदर्शन कुमार, अहमदनगर उपकेंद्र समिती सदस्य अमित कोल्हे, डॉ. राजधर टेमकर, प्रा. डॉ. जयश्री सिनगर, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. प्रदीप दिघे, डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. युवराज नरवडे, सचिन गोर्डे, अमोल घोलप, बाबुर्डी घुमटच्या सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच ज्योती परभाणे आदी उपस्थित राहणार आहेत. Ahmednagar News

Leave a Comment