Ahmednagar News: मराठा संघटनेकडून मोठी घोषणा! आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ….

Ahmednagar News: कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरकडून एका बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये सरकार विरुद्ध लोकशाही पद्धतीने लढण्याचा तसेच राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहमदनगर शहरात प्रवेश करता येऊ नये यासाठी आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी! मिळत आहे 36 हजारांपेक्षा स्वस्त; जाणुन घ्या नवीन दर

या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 पेक्षा जास्त उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीने मराठा आरक्षणासाठी चालणाऱ्या आंदोलनाला सरकारने ओबीसी नेत्यांचा वापर करून, पोलिसांचा वापर करून आणि आता मराठा नेत्यांचा वापर करून हुकुमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.

वन नेशन वन इलेक्शनची तयारी पूर्ण ! ‘या’ वर्षापासून एकाच वेळी होणार लोकसभा – विधानसभा निवडणुका

यामुळे आता आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 पेक्षा जास्त उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. जर सरकार आम्हाला मदत करत नसेल तर आम्ही सरकारला लोकशाही पद्धतीने पराभव करू असा इशारा देखील यावेळी मराठा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment