Ahmednagar News: मोठी बातमी! फरार पालिका आयुक्त पंकज जावळे अटक टाळण्यासाठी न्यायालयात; आज होणार सुनावणी

Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेले अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार आयुक्त पंकज जावळे यांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे.

काही दिवसापूर्वी एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालनातील पथकाने मिळून अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयावर छापा मारला होता. तेव्हापासूनच पंकज जावळे फरार आहे.

एसीबीने त्यांच्यावर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी (4 जुलै) रोजी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

पालिका आयुक्त पंकज जावळे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खरबड उडाली होती.

एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment