Ahmednagar Loksabha Election 2024 | ठाकरेसेनेची अर्थपूर्ण शांतता; कोणाच्या पारड्यात वजन टाकणार?

Ahmednagar Loksabha Election 2024 | अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा देशभरात बऱ्याच ठिकाणी लढाया स्पष्ट झालेल्या दिसतात. अहमदनगर लोकसभा मंतदारसंघातूनही (Ahmednagar Loksabha Election 2024) आता दुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा सत्तासोपान चढवण्याचा चंग बांधला आहे. तर, शरदचंद्र पवार (Sharad Pawar) प्रणीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे (NCP) आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी शंख फुंकले आहे. एकूणच प्रचारात रंगत सुरू झाली आहे.

मात्र, या सर्व खेळात अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Loksabha Election 2024)  शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) अर्थात ठाकरेसेना (Thackeray Sena) एकदम शांत असल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्यातील (Ahmednagar Shivsena) सर्वच तालुक्यात ठाकरेसेनेचे दमदार सैनिक आहेत. सर्वजण यंदा काहीही करून भाजपला देशातील सत्तेतून हद्दपार करण्याची घोषणा देत आहेत. सोशल मीडियामध्ये त्यांनी आपली अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनीही ‘आब की बार, तडीपार सरकार’ (Ab Ki Baar Tadipar Sarakar) असे म्हणत दिल्लीतून शंखनाद केला आहे. मात्र, त्यांचे नगर जिल्ह्यातील शिलेदार मात्र अजूनही अर्थपूर्ण शांत आहेत. एकूणच यामुळे ठाकरेसेनेचा पाठिंबा नेमका कोणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार शंकर गडाख (MLA Shankar Gadakh), प्रा. शशिकांत गाडे (Shashikant Gade), रावसाहेब खेवरे (Raosabeh Khevare), संदेश कार्ले (Sandesh Karle) यांच्यासह सर्वच शिवसैनिक अजूनही म्हणावे असे सक्रिय दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या कॉँग्रेस आणि शरदचंद्र पवार प्रणीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी यांच्यातर्फे प्रचार सुरू झालेला असतानाही ठाकरेसेनेची अर्थपूर्ण शांतता अनेकांना खटकत आहे. मार्केट कमिटी किंवा गावोगावाच्या कट्ट्यांवर याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे. उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (Shirdi Loksabha Election 2024) Bhausaheb Vakchaure) किंवा आमदार लंके यांनी अजूनही ठाकरेसेनेच्या शिलेदारांना थेट संपर्क केला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता विखे गट आणि भाजपने याचा फायदा घेत प्रचारात आघाडी घेतली आहे.

मोठी ताकद असलेल्या ठाकरेसेनेची अर्थपूर्ण शांतता पाहून यंदा पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात (Ahmednagar Loksabha Election 2024) दोन्ही मतदारसंघांवर भाजप-शिवसेना यांचाच झेंडा फडकणार असा दावा भाजप आणि मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते करत आहेत. एकूणच आघाडीतील या बेकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता सध्यातरी दिसत असल्याने विखे गट निश्चिंत झालेला आहे. मात्र, पक्षाचा आदेश आणि मोदींना तडीपार करण्याच्या घोषणेला साथ देण्याची शिवसैनिकांची जिद्द लक्षात घेता अखेरच्या टप्प्यात सर्व शिवसैनिक आघाडीचा धर्म लक्षात घेऊन उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार लंके यांच्या पाठीशी उभे ठाकल्यास निकाल बदलून दोन्ही मतदारसंघात बदल दिसणार अशीच खात्री आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे. मागील वेळी विखे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले हे सर्व कार्यकर्ते यंदा नाराज असून त्याचा फटका निश्चितच शिवसेना आणि भाजपला बसेल असेच बोलले जात आहे. मात्र, यावरून अजूनही पडदा उठलेला नसल्याने विखे गट निश्चिंत असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment