Ahmednagar Loksabha Election 2024 | तर विखे पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण? उठू लागल्या ‘त्यांच्या’ वावड्या

Ahmednagar Loksabha Election 2024 | अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनाच संधी दिली आहे. एकीकडे भाजपचा (BJP MP Candidate in Ahmednagar) प्रचार सुरू झालेला असतानाच आता विखे पाटलांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून नेमका कोण उमेदवार असणार (Ahmednagar Loksabha Election 2024) याचे भिजत घोंगडे कायम आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार नीलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांचे नाव आघाडीवर असतानाच त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके (Ranitai Lanke) यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे आलेले आहे. मात्र, आमदार लंके यांच्यावर असलेला पक्षाचा दबाव लक्षात घेता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.

अशावेळी आता राणीताई लंके यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यावर त्या फक्त डमी उमेदवार म्हणून राहतील असे म्हणत अनेकांनी विखे यांचेच पारडे अशावेळी जड असेल असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विखे यांना शह देण्यासाठी एकतर आमदार नीलेश लंके असावेत किंवा मग इतर कोणीही थेट लढत द्यावी असाच सुर दिसत आहे. मात्र, एकटे आमदार नीलेश लंके यांनीच तयारी करून ठेवलेली असताना विखे यांना लढत देईल असा दूसरा सक्षम पर्याय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे नाही. आणि आमदार नीलेश लंके नसतील तर मग कोण रिंगणात असणार, असाही पेच कायम आहे. म्हणून इतर नावांवर पान चर्चा सुरू झालेली आहे.

आमदार नीलेश लंके यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्यासह पक्षाचा मोठा दबाव आहे. पवार कुटुंबियांच्या अंतर्गत लढाई सुरू झाल्याने हा मोठा दबाव आहे. त्यामुळेच लंके यांनी त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे ठेवले आहे अशी चर्चा आहे. मात्र, एकूण विखे यांचा मोठा संपर्क, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांची राजकीय कार्यकर्त्यांची सक्षम फळी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे (Shalintai Vikhe) यांची साथ असताना राणीताई लंके यांच्यापेक्षा आमदार नीलेश लंके यांनीच निवडणूक लढवावी असा सुर आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने आता इतर वावड्या उठत आहेत. (Ahmednagar Loksabha Election 2024)

स्वत: आमदार नीलेश लंके उमेदवारी करणार नसल्यास मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशावेळी मग माजी मंत्री आणि कॉँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीच विखे यांना लढत देण्याची मागणी दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. किंवा काहींनी तर अशावेळी मग थेट खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच नगर जिल्ह्यातून उमेदवारी करावी किंवा अखेरचा सक्षम पर्याय म्हणून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीच पक्ष हितासाठी रिंगणात उतरावे अशीही मागणी खासगी बैठकीत सुरू झालेली आहे. मात्र, स्वत: आमदार नीलेश लंके उमेदवारी करणार असल्यास मग विजयी होण्याची खात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, विखे व लंके अशी दोघांनाही ही लढत सोपी नसेल हे निश्चित असेच म्हटले जात आहे.

1 thought on “Ahmednagar Loksabha Election 2024 | तर विखे पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण? उठू लागल्या ‘त्यांच्या’ वावड्या”

Leave a Comment