Ahmednagar Lok Sabha Election : विखेंसाठी ‘राष्ट्रवादी’चं खास प्लॅनिंग; गुरुवारी नगरमध्ये ठरणार रणनीती

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे (Ahmednagar Lok Sabha Election) चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आणि महाविकास विभाग आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात (Nilesh Lanke) लढत होणार आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता या दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. निलेश लंके यांनी काल मोहटादेवी गडावरून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली तर दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनीही प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. येत्या गुरुवारी (4 एप्रिल) मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नगर शहरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात रणनीतीवर चर्चा होणार आहे.

Osmanabad Lok Sabha : ठाकरेंच्या शिलेदाराला कोण टक्कर देणार? महायुतीचं अजून काही ठरेना..

Ahmednagar Lok Sabha Election

हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार अरुण जगताप, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके टफ फाईट

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत अखेर निश्चित झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, महाविकास आघाडी मात्र तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. परंतु, येथे उमेदवार काही मिळत नव्हता. निलेश लंके यांचेही तळ्यात मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी काल सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता नगर दक्षिण मतदारसंघात लंके सुजय विखेंना टफ फाईट देतील अशी चिन्हे आहेत.

Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..

Ahmednagar Lok Sabha Election

2 thoughts on “Ahmednagar Lok Sabha Election : विखेंसाठी ‘राष्ट्रवादी’चं खास प्लॅनिंग; गुरुवारी नगरमध्ये ठरणार रणनीती”

Leave a Comment