Ahmednagar Lok Sabha : लंकेंविरोधात विखे-शिंदे एकत्र; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास मेसेज

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपातील (Ahmednagar Lok Sabha Election 2024) अंतर्गत मतभेद मिटविण्यात पक्षश्रेष्ठींना यश येत असल्याचे दिसून येत आहे. कारण काही दिवसांपूर्वी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे वक्तव्य आमदार राम शिंदे यांनी (Ram Shinde) केले होते. परंतु यानंतर ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्या यादीत विद्यमान खासदार सुजय विखे यांचे (Sujay Vikhe) नाव होते. यानंतर राम शिंदे यांचा विरोध काहीसा मावळ होऊ लागला याची प्रचिती अनेक वेळा दिसूनही आली. आताही जामखेडमध्ये एक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दोघांनी आमच्यातील मतभेद मिटल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत राम शिंदे आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील एकत्रित दिसून आले. त्यामुळे आमच्यातील मतभेद मिटले आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न या बैठकीतून करण्यात आला. या दोघांतील मतभेद मिटविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) निवासस्थानी काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती.

Ahmednagar Lok Sabha Election : विखेंसाठी ‘राष्ट्रवादी’चं खास प्लॅनिंग; गुरुवारी नगरमध्ये ठरणार रणनीती

Ahmednagar Lok Sabha

या बैठकीसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मतभेद मिटल्याचे सांगण्यात आले होते परंतु मनभेद कायम असल्याचे शिंदे म्हणाले होते. आता मात्र राम शिंदे यांच्याच पुढाकारातून जामखेडमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रचाराचे नियोजन सुरू झाल्याचे दिसून आले.

या बैठकीत निवडणूक प्रचाराच्या संदर्भात पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यासमोर आपले समस्या मांडल्या. या समस्यांवर उत्तर देताना सुजय विखे पाटील म्हणाले आता कोणतेही गैरसमज उरणार नाहीत. आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विखे पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद आता राहिलेले नाहीत एकदिलाने आणि एकजुटीने आगामी काळात काम करायचे आहे असे सांगितले. या बैठकीसाठी जामखेड तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar Lok Sabha : आता निलेश लंके मैदानात! जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात

Ahmednagar Lok Sabha

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके टफ फाईट

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत अखेर निश्चित झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, महाविकास आघाडी मात्र तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. परंतु, येथे उमेदवार काही मिळत नव्हता. निलेश लंके यांचेही तळ्यात मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी काल सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता नगर दक्षिण मतदारसंघात लंके सुजय विखेंना टफ फाईट देतील अशी चिन्हे आहेत.