Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Doctors News: म्हणून डॉक्टरांच्या रजा-सुट्ट्या रद्द; पहा नेमकी काय परिस्थिती ओढवली

Doctors News: सोलापूर (Solapur) : सध्या लम्पि (Lumpy) या आजाराने देशभर डोके वर काढले आहे. या आजाराने लाखो जनावरांना ग्रासले आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यासह मध्यप्रदेशमध्ये या आजारामुळे लाखो पाळीव जनावरे मृत पावले आहेट. महाराष्ट्र राज्यातही हा जनावरांचा चर्मरोग (skin disease) वेगाने फैलावत आहे. लाखो मुक्या जनावरांना प्राणास मुकावे लागलेल्या या आजाराने महाराष्ट्रात ही आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यासाठी राज्याचा पशुसंवर्धन विभाग सजगपणे कार्यरत आहे.

Advertisement

राज्यात सर्वप्रथम जळगावात या लम्पि आजाराची जनावरांना लागण झाली. त्यानंतर पुणे (pune), धुळे (dhule), लातूर (latur), औरंगाबाद (aurangabad), अकोला (akola), बीड (beed), नाशिक (nashik), अहमदनगर (ahmednagar) यासह अनेक ठिकाणी हा आजार पोहोचला आहे. लम्पि हा संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण इतर जनावरांना वेगाने होताना दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून बाधित असणारे क्षेत्र, गोशाळा (cowshed), डेअरी फार्म (dairy farm) अश्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तसेच जनजागृती केल्यास हा आजार होण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे. यासाठी या सर्व बाबींमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) व कर्मचारी यांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Loading...
Advertisement

हा आजार आटोक्यात आणण्यासाठी व यावर योग्य ती उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. आजपर्यंत राज्यात एकूणच १० हजार यापेक्षाही अधिक जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. तसेच अनेक जनावरे योग्य उपचाराने बरे झाल्याचेही पशुसंवर्धन विभागामार्फत (Department of Animal Husbandry) सांगण्यात आले. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुवैद्यकीय तज्ञांना याबाबत सजग राहून हा साथीचा आजार आटोक्यात आणण्याच्या सूचना केल्या आहेत. (Minister Radhakrishna Vikhe Patil has instructed the veterinary experts to be aware of this and bring the epidemic under control.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply