Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IMD Alert: मुसळधार विजेच्या पावसात ‘अशी’ घ्या’ काळजी; पहा कुठे होणार आहे पाऊस

IMD Alert: सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या विस्तारीत अंदाजानुसार (Extended Forecast of India Meteorological Department Regional Meteorological Center, Mumbai (ERFS)) (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)  दिनांक ०७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि हवामान केंद्र (कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर) यांनी केले आहे. (Madhya Maharashtra Division (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur) (Krishi Vigyan Kendra, Mohol, Solapur))

Advertisement

त्यांनी सामान्य सल्ला देताना म्हटले आहे की, शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे किड व रोगसंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुसकान पातळीच्या वर आसल्यास योग्य उपाययोजना कराव्यात. पिकांतील आंतरमशागतीचे कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत. पडणार्‍या पावसाचे पाणी शेतात साठविण्यासाठी/ मुरविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा . शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे किड व रोगसंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुसकान पातळीच्या वर आसल्यास योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. (farmers should take care as follows as there is a possibility of thunder and lightning)

Loading...
Advertisement
  • मेघ गर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी बांबू च्या सहय्याने आधार द्यावा.
  • शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे.
  • जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत.
  • वाहने झाडाखाली उभी करू नयेत.
  • काढणी केलेला शेती माल प्लास्टिकच्या शीटणे झाकावा.
  • विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळा.
  • जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये.

Advertisement

Leave a Reply