Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Monsoon Alert: ‘तिथे’ कोसळणार आहे पाऊस; शेतामध्ये करा ‘अशी’ तयारी

Please wait..

Monsoon Alert : सोलापूर : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे (Regional Meteorological Centre, Mumbai) कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार (weather forecast) सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १३,१४ जुलै २०२२ रोजी काही ठिकाणी तर दिनांक १५,१६ आणि १७ जुलै २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

या कालावधीत करावयाची शेतीची कामे आणि घेण्याची काळजी याबाबत कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर (Meteorological Centre, Agricultural Science Centre, Mohol, Solapur) यांनी कृषी सल्ला जारी केला आहे. कारण, विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक १७ जुलै ते २३ जुलै २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra region (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)

Advertisement

Advertisement
सामान्य सल्ला खरीप नियोजनकरिता पेरणी पूर्व कामे सुरू करावीत ( उगवण क्षमता तपासणे, जमिनीतील अन्नद्रव्य तपासणे दर्जेदार व प्रमाणित बियाणाचे नियोजन करणे, मशागतीची कामे  करणे )
Advertisement

शेतकरी बंधूंनी स्वता:कडे सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेण्याची चाचणी करावी.

Advertisement

हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.

संदेश मागील आठवड्यात जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील ओल लक्षात घेऊन वापसा आल्यास पेरणी करावी.
सोयाबीन पेरणीची तयारी पेरणीची वेळ: सोयाबीन पिकाची पेरणी  १५ जुलै पर्यन्त करता येते.  जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी.
Advertisement

बीजप्रक्रिया: जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाणास थायोफिनेट मीथाईल ५० ग्रॅम प्रती लिटर + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५० ग्रॅम एफ.एस.प्रती लिटर किंवा अॅझोक्सिस्ट्रोबीन २.५% + थायोफिनेट मिथाईल ११.२५% + थायोमिथोक्झाम ३०% एफ.एस. १० मिली प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रीया करावी त्यामुळे खोड माशी पासून रोपावस्थेत पिकाचे संरक्षण होईल.

Advertisement

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Advertisement

आंतरपिके: सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.

Advertisement

खत मात्रा:

Advertisement

सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपुर्वी जमिनीत मिसळून द्यावीत, अथवा चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावे.

मका पेरणीची तयारी पेरणीची वेळ: मका पिकाची पेरणी १५ जुलै पर्यन्त करता येते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी करावी.
Advertisement

बीजप्रक्रिया: २ ते २.५ ग्राम थायरम प्रती किलो बियाण्यास पेरणीपुर्वी लावावे. तसेच पेरणीपूर्वी अझॅटोबॅक्टर वापरावे.

Advertisement

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Advertisement

खत मात्रा: पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रती हेक्टर, पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र, पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ४० किलो नत्र प्रती हेक्टर.

Advertisement

सूक्ष्म अन्नद्रव्य : जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

सूर्यफूल पेरणीची तयारी पेरणीची वेळ: सूर्यफूल पिकाची पेरणी १५ जुलै पर्यन्त करता येते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास सूर्यफूल पिकाची पेरणी करावी.
Advertisement

बीजप्रक्रिया: केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५ डब्ल्यू.एस. प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी थायामिथोक्झाम ३०% एफ.एस.१० मिली प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

Advertisement

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Advertisement

खत मात्रा:  कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात मिसळून द्यावे.

बाजरी पेरणीची वेळ: बाजरी पिकाची पेरणी १५ जुलै पर्यन्त करता येते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास बाजरी पिकाची पेरणी करावी.
Advertisement

पेरणीचे अंतर : कोरडवाहु क्षेत्रात दोन ओळीत ४५ सेमी आणि दोन रोपामध्ये १५ सेमी अंतर ठेवावे. (हेक्टरी सुमारे २.२२ लाख रोपे), नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे ३० X १५ सेमी अंतरावर पेरणी करावी.

Advertisement

खत मात्रा: ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश हलक्या जमिनीत तर मध्यम जमिनीत ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रती हेक्टरी . पेरणीच्या वेळी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालश आणी २५ ते ३० दिवसांनी उर्वरित अर्धा नत्र ( जमिनीत ओलावा असताना) द्यावा. रसायनिक खते दोन चाडीच्या पाभरीने पेरून द्यावीत.

भुईमूग पेरणीची तयारी पेरणीची वेळ: भुईमूग पिकाची पेरणी १५ जुलै पर्यन्त करता येते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास भुईमूग पिकाची पेरणी करावी.
Advertisement

बीजप्रक्रिया: बियाण्यापासून प्रादुर्भाव होणार्‍या व रोपावस्थेत येणार्‍या रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्राम थायरम किंवा २ ग्राम कार्बेन्डीझम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्राम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळनारे जिवाणू संवर्धक (घनरूप किंवा द्रवरूप) चोळावे.  बिजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.

Advertisement

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Advertisement

खत मात्रा: पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे.

Advertisement

खत व्यवस्थापन (सुधारित शिफरशीनुसार २०१३ ) भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० किलो किलोग्राम प्रती हेक्टरी ( २०० किलो किलोग्राम प्रती हेक्टरी पेरणीवेळी तर उर्वरित २०० किलो किलोग्राम प्रती हेक्टरी आर्‍या सुटताना ) जमिनीत मिसळून द्यावे.

ऊस आडसाली ऊस पिकाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत करावी. उसासाठी ७.५ ते ८ सामू असलेली मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. आडसाली उसाच्या लागणपूर्व तयारीच्या दृष्टीने जमिनीची निवड, पूर्व मशागत, रान बांधणी, ऊसजाती, बेणे उपलब्धता, सेंद्रिय व रासायनिक खत पुरवठा, तणनाशके व आंतरपिके याबाबत तजवीज करून ठेवावी.
केळी लागवड सिंचनाची पुरेशी सुविधा उपलब्ध असल्यास मृग हंगामासाठी (जून-जुलै ) केळी लागवड करावी.
Advertisement

केळी लागवडीसाठी मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली आणि पाण्याचा निचरा होणारी  जमीन निवडावी . जमिनीचा सामू ६.५ ते ८.०च्या दरम्यान असावा. केळी लागवडीसाठी फुले प्रोईड, ग्रांड नैन आणि श्रीमंती या वाणांची निवड करावी. लागवडीचे अंतर (चौरस पद्धत): १.५ मि. * १.५ मि (हेक्टरी ४४४४ रोपे )

Advertisement

उती संवर्धित रोपांची लागवड करायची असल्यास जातिवंत वाणांची, विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे खात्रीशीर व शासन मान्य उत्पादकांकडून खरेदी करावीत. उतिसंवर्धित रोपे एक सारख्या वाढीची ३० ते ४५ सेमी उंचीची आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत.

डाळिंब मृग बहार
Advertisement

फुलधारणा आणि फळधारणा

जर बागेत आधिपासूनच तेलकट डागाचा प्रादुर्भाव असेल तर स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट ९०% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड १०%) @ ०.५ ग्रॅम प्रती लिटर हे महिन्यातून एकदा आणि ७-१० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. गरजेपेक्षा अधिक फवारण्या टाळाव्यात. जर पाऊस झाला असेल नंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
जनावरांचे व्यवस्थापन जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यास चारा पिकांची पेरणी करावी.
Advertisement

खरीप हंगाममध्ये जनावरांच्या खाद्यासाठी पुढील चारा पिकाच्या वाणांची निवड करावी:

Advertisement

ज्वारी : रुचिरा, फुले अमृता, माळदंडी ३५-१, फुले गोधन या वाणांची निवड करावी.

Advertisement

मका : आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, विजय, गंगा सफेत – २ या वाणांची निवड करावी.

Advertisement

संकरीत नेपियर गवत : फुले जयवंत, फुले गुणवंत या वाणांची निवड करावी.

Advertisement

जनावरांना लाळखुरकत, फऱ्या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात.

 

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply