Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IMD Alert: ‘त्या’ भागात होणार दमदार पाऊस; पहा पावसाचा अंदाज

Please wait..

IMD Alert: सोलापूर : सध्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुरू झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला चिंब केले आहे. काही ठिकाणी तर पुर परिस्थिति निर्माण झाल्याने शाळा व कॉलेज बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अशावेळी आता पुढच्या आठवड्यात मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागात (Central, western Maharashtra and Khandesh) जोरदार म्हणजेच सारसरीच्या पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर (Rural Agricultural Meteorological Service, District Agricultural Meteorological Center, Agricultural Science Center, Mohol, Solapur) यांनी हवामान आधारित कृषि सल्ला यामध्ये असे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Indian Meteorological Department, Regional Meteorological Center, Mumbai) यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १३,१४ जुलै २०२२ रोजी काही ठिकाणी तर दिनांक १५,१६ आणि १७ जुलै २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान २७.६ अंश सेल्सिअस ते ३१.८ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ८१ ते ८८ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ६१ ते ७९ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग ताशी २५.० किमी ते ३४.० किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement

तर विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) ((Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)) दिनांक १७ जुलै ते २३ जुलै २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील ओल लक्षात घेऊन वापसा आल्यास पेरणी करावी, असेही त्यात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply