Take a fresh look at your lifestyle.

Farming Tips : हरभऱ्याचे साठवणुकीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून ‘ही’ घ्या काळजी

हरभ-याचे (chick pea farming) मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला देशी हरभरा (Gavaran Harbara) आणि दुसरा काबुली हरभरा (Kabuli Harabara). देशी हरभरा तपकिरी, हिरव्या रंगाचा असतो काबुली हरभरा पांढरा असतो. देशी हरभरा हा समशितोष्ण प्रदेशात चांगला येतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने देशी हरभराच पिकविला जातो, देशी हरभ-यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली असते.

Advertisement

Advertisement

हरभरा पीक (harbara plant) काढून झाल्यावर लगेचच पोत्यामध्ये साठवण करुन ठेवुन दिल्यास त्यास सोंड किडीमुळे मोठे नुकसान होते (ब्रुचीड बिटल) याकरिता पीक काढल्यानंतर धान्यास चांगले उन्हात वाळविणे महत्वाचे असते. (chick pea farming tips in Marathi for Maharashtra farmers)

Advertisement

हरभरा पीक घाटे वाळू लागताच काढून घ्यावे, अन्यथा जास्त वाळल्यावर धाटे गळ फार होते. त्यांनतर खळ्यावर हरभरा २-३ दिवस चांगला याळवून मळणी करावीं. साठवणीयूर्वी हरभरा धान्य ५-६ दिवस चांगले कडक उनहात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जागेत करु नये. शक्य असल्यास कडधान्यास एक टक्का लिंबोळी किंवा मोहाचे किंवा करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणीतील किडीपासून सुरक्षित राहते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply