औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील औराळा येथे माजी आमदार स्वर्गीय बाबुरावजी औराळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित व्याख्यान व वार्षिक शेती नियोजन (agriculture management) कार्यक्रमात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (punjab dakh havaman andaj live) यांनी चालू वर्षीच्या हवामान अंदाजाबद्दल (weather and monsoon rain forecast in Maharashtra) भाकीत व्यक्त केले.
यावेळी आदर्श पाटोदा गावाचे माजी सरपंच भास्कराव पाटील पेरे (sarpanch bhaskar pere patil), कृषीभूषण भाऊसाहेब थोरात (krushi bhushan bhausaheb thorat), माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे, गिताराम पवार, कैलास देशमुख, प्राचार्य डॉ. विजय भोसले, व्ही.एन.भोसले, नरेंद्र देशमुख, सुभाष काळे, धनंजय देशमुख, गणेश निकम, अरुण वाघ, मनोज अग्रवाल, दादासाहेब इंगळे,सारंगधर शेळके, संजय देशमुख विजय जगताप, सुशील वाघ, संजय देशमुख, बाळासाहेब निकम, अभिषेक शेळके आदी उपस्थित होते.
Agriculture News: छोट्या शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज..! पहा न्यायालयाने काय आदेश दिलेत शेतकरी हिताचे https://t.co/YJvmdjMLYQ
Advertisement— Krushirang (@krushirang) May 6, 2022
Advertisement
पंजाबराव डख म्हणाले की, गेल्या काही वर्षात पृथ्वीचे तापमान वाढल्याने (global warming) आपल्याकडे पावसाचे व गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे झाडांचे प्रमाण खूप कमी असल्याने पाऊस धो-धो पडतो व त्यामुळे नुकसानही होते. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्या परिसरात झाडे (tree plantation) लावण्याची आवश्यकता आहे. यावर्षी २ जून पासून पावसाळा सुरू होणार असून यंदाही पावसाचे प्रमाण चांगले असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तर, “गेल्या साठ वर्षात आपले आयुष्यमान १०० हुन ५० वर्षांवर आले आहे. विज्ञानाने प्रगती केली तर आयुष्यमानही वाढणे आवश्यक होते. मात्र उलटे झाले. यासाठी स्वच्छता गृहाचा वापर, चांगले पिण्याचे पाणी, चांगले अन्न आवश्यक असून गावाच्या सरपंचाने या सुविधा ग्रामस्थांना पुरवणे आवश्यक आहे. लोकांकडून पैसे घ्या, चांगल्या सुविधा द्या कारण शासकीय पैशातून असे कामे होणार नाहीत. समाजातील लोकांनी नेमके काय केले पाहिजे म्हणजे त्यांचा विकास होईल हे कर्त्या लोकांनी कधी सांगितलेच नाही त्यामुळे समाज भरकटला असून कर्त्या लोकांनी योग्य दिशा दिल्यास त्यानुसार समाज वागत असतो, असे पेरे पाटील यांनी यावेळी म्हटले.
Agriculture News: आता हवेतही बिजोत्पादन शक्य..! पहा आईसीएआर केंद्राच्या संशोधनाची माहिती https://t.co/7xAi2NmoQC
Advertisement— Krushirang (@krushirang) May 6, 2022
Advertisement