Rain Update: अवकाळीमुळे अशी घ्या पोल्ट्री व पशुधनाची काळजी; पहा काय आहे कृषी सल्ला
सोलापूर : तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह (वार्याचा वेग ताशी ३०-४०कि.मी.) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी स्व:ताची व आपल्या पशुधंनाची काळजी (animal health care in rainy season marathi mahiti / information) घ्यावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र (मोहोळ, सोलापूर) (KVK Mohol) यांच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पाच्या जिल्हा कृषि हवामान केंद्र यांनी केले आहे.
- Rain Update: ‘त्या’ भागात पावसाची शक्यता; पहा कसे असेल हवामानही
- Subsidy on agricultural machinery: ‘त्यासाठी’ मिळतेय 50 % अनुदान; क्लिक करून वाचा योजना
- Agriculture Update: ‘त्यासाठी’ 15 भरारी पथकांची स्थापना; पहा काय नियोजन केलेय कृषी विभागाने
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई (weather update from imd Mumbai) यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये (Solapur District rain update) दिनांक ०४ आणि ०५ मे २०२२ रोजी काही ठिकाणी तुरळक हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दिनांक ०२/०५/२०२२ रोजी झाली. त्यात म्हटले आहे की, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने जनावारांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. सर्व जनावरांना रोग प्रतिबंधक उपाय म्हणून पशु वैद्यकाच्या सहाय्याने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे. पोटातील जंताच्या नियंत्रणासाठी पशु वैदयकाच्या सहाय्याने जंतनाशक पाजावे. तसेच जनावरांना व पक्ष्यांना नेहमी पिण्यास स्वछ आणि थंड पाणी द्यावे. जनावरांकडून सकाळी ११ ते दुपारी ०५ या वेळेत कामे करून घेऊ नयेत व चरावयास सोडू नयेत. पेंढयाच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर झाकून ठेवावे. तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग दयावा किंवा शेण-चिखलसह थर द्यावा, शेडमध्ये पंखे, वाटरस्पे आणि फोगर्स वापरावे. तीव्र उष्णते दरम्यान, पाणी फवारणी करावी आणि गोठयाजवळच थंड पाण्यासाठी सोय करावी. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य दयावे. कुकुट पालन (Poultry farming tips in rainy season) शेड मध्ये पडद्याचा वापर करावा आणि व्यवस्थित हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
Rain Update: ‘त्या’ भागात पावसाची शक्यता; पहा कसे असेल हवामानही https://t.co/8toKc3VRuI
Advertisement— Krushirang (@krushirang) May 4, 2022
Advertisement