Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘अवकाळी’सह उन्हाळ्यातही ‘अशी’ घ्या पोल्ट्री व जनावरांची काळजी; पहा केव्हीके मोहोळ यांचा कृषी सल्ला

Please wait..

सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक  ०५, ०६, ०७ एप्रिल २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची  शक्यता असल्याने पिकांची काळजी घेण्यासह पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. मोहोळ येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा (जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ , जि. सोलापूर) यांनी हवामान आधारित कृषि सल्ला यामध्ये म्हटले आहे की,

Advertisement
जनावरांचे व्यवस्थापन तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने जनावारांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.सर्व जनावरांना रोग प्रतिबंधक उपाय म्हणून पशु वैद्यकाच्या सहाय्याने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे. पोटातील जंताच्या नियंत्रणासाठी पशु वैदयकाच्या सहाय्याने जंतनाशक पाजावे. तसेच जनावरांना व पक्ष्यांना नेहमी पिण्यास स्वछ आणि थंड पाणी द्यावे. जनावरांकडून सकाळी ११ ते दुपारी ०५ या वेळेत कामे करून घेऊ नयेत व चरावयास सोडू नयेत. पेंढयाच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर झाकून ठेवावे. तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग दयावा किंवा शेण-चिखलसह थर द्यावा, शेडमध्ये पंखे, वाटरस्पे आणि फोगर्स वापरावे. तीव्र उष्णते दरम्यान, पाणी फवारणी करावी आणि गोठयाजवळच थंड
Advertisement

पाण्यासाठी सोय करावी. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य दयावे. कुकुट पालन शेड मध्ये पडद्याचा वापर करावा आणि व्यवस्थित हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

 

Advertisement
Loading...

(Source : AGROMET ADVISORY BULLETIN GRAMIN KRISHI MAUSAM SEWA, DISTRICT AGROMET UNIT, KRISHI VIGYAN KENDRA, MOHOL, SOLAPUR.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply