Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Goat Farming Info: जुळ्या कराडांचे गुणोत्तर असे वाढवा; नफ्यासाठी वाचा ‘या’ महत्वाच्या ट्रिक्स

शेळीपालनाचे गणित बेरजेचे नाही, तर गुणाकाराचे करूनच आपणास याद्वारे जास्त नफा मिळू शकतो. नव्हे, प्रत्येक व्यवसायालाच हे गुणाकाराचे गणित लागू होते. या गुणाकाराच्या गणिताकडे लक्ष न दिल्यास व्यवसायात फ़क़्त वाजवाकी नाही, तर अनेकदा थेट भागिले प्रकारचे गणितही लागू होऊ शकते. असे सगळे टाळण्यासाठी शेळ्यांच्या दिसण्यापेक्षा जास्त आणि सदृढ करडे देण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. (Goat Farming business Tricks to increasing money in Marathi language)

Advertisement

आज आपण एकाच शेळीला जुळे (दोन) किंवा तीळे (तीन) करडे होण्यासाठीच्या काही ट्रिक्स अभ्यासणार आहोत. यामध्ये दिलेल्या ट्रिक्स १०० टक्के लागू होतात असे नाही मात्र, याद्वारे अशा पद्धतीने करडे होण्याची संख्या निश्चित वाढते हे नक्कीच. कारण, फ़क़्त जात हा घटक नाही, तर आपल्याकडील शेळीची तब्बेत आणि मुख्य म्हणजे तिला मिळणारा पोषक आहार यावरही शेळ्या गाभण राहून करडे किती होऊ शकतात याचे गुणोत्तर ठरते.

Advertisement

खालील ट्रिक्स त्यासाठी वापरा :

Loading...
Advertisement
  • जुळ्या किंवा तिळ्या कराडांच्या शेळ्या निवडून ठेऊन त्यांचे प्रमाण आपल्या कळपात वाढवावे.
  • अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त करडे देणाऱ्या शेळ्यांच्या पाठी (माद्या) कळपात ठेऊन कळप वाढवावा.
  • जुळी करडे न देणाऱ्या शेळ्या टप्प्याटप्प्याने कळपातून काढून टाकाव्यात.
  • पहिल्या दोन वेतामध्ये शेळ्या जुळी किंवा तिळी करडे शक्यतो देत नाहीत. त्यामुळे अशा शेळ्या ओळखण्यासाठी व ठरवण्यासाठी तिसऱ्या वेताची वाट पहावी.
  • बेणूचा बोकड निवडताना असा बोकड (नर) जुळ्या कराडांमध्ये जन्मलेला आणि सदृढ असावा.
  • असा बेणूचा नर शक्यतो जुळ्या किंवा तिळ्या कराडांमधील सर्वात मोठा असेल अशीच काळजी घ्यावी.
  • प्रजननक्षम झालेल्या शेळ्यांना सकस आहार देण्यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे. कारण, त्यांची शारीरिकदृष्ट्या असलेली क्षमता सदृढ व जास्त कराडांचे प्रजनन करण्यासाठी खूप महत्वाची ठरते.
  • शेळ्यांच्या आहारात प्रथिनयुक्त चारा व खुराक यांचा वापर करून त्यांना निरोगी व सदृढ बनवण्याची काळजी घ्यावी.
  • प्रजननासाठी तयार असलेल्या शेळ्यांना हंगामापूर्वी सलग १५ दिवस वजनानुसार ३००-५०० ग्रॅम आणि त्यामध्ये २०-३० क्षार यांचे मिश्रण द्यावे. त्यामुळे अंडकोषातून जास्त अंडी बाहेर पडण्यास मदत होते.
  • जातवान बोकड व शेळ्या यांची निवड करून कळप तयार करा. त्यामध्ये चांगल्या शेळ्या व बोकड यांची भर टाकावी.

लेखन आणि संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः) वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply