Take a fresh look at your lifestyle.

Poultry Farming Info: अशी घ्या पिल्लांची काळजी; कारण, तेच आहेत व्यवसायाचा खरा आधार

कोंबडीपालन किंवा अंडी उत्पादन याचा मुख्य आधार असतात ती पिल्ले. होय, आपण आणलेली पिल्ले सदृढ असणे आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवणे यातूनच नफ्याकडे वाटचाल सहजशक्य होते. कारण, हीच पिल्ले मोठी होऊन चिकन आणि अंडी याचा मुख्य स्त्रोत बनतात. आज आपण पाहणार आहोत की, छोट्या पिलांची नेमकी काय काळजी घ्यावी. (Poultry farming business tricks and tips for chicks management) पिल्ले घेताना एका दिवसाची घ्यावीत. अशी पिल्ले शक्यतो शासकीय अंडी उबवणी केंद्रातून किंवा चांगल्या खात्रीशीर पुरवठादार यांच्याकडून घ्यावीत. त्यांच्या शरीराचे तापमान साधारणतः40 ते 41 अंश सेल्सिअस म्हणजे 107 डिग्री फॅरेनहाइट दरम्यान राहील याची काळजी घ्यावी. पिल्लांची वाहतूक करताना व्यवस्थित करावी. वाहतुकीत पिल्लांची जास्त आदळआपट होणार नाही. तसेच त्यांना वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी प्लास्टिकच्या खोक्यांचा वापर वाहतुकीसाठी वापर करा.

Advertisement

खोक्यात प्रमाणापेक्षा जास्त पक्षी भरल्यास गुदमरून पक्षी मरतात. त्याचीही काळजी घ्या. पिलांची वाहतूक जास्त लांब असेल तर त्यांना कलिंगडाच्या फोडी खाण्यास टाका. 48 ते 72 तासापर्यंत पिल्लांना काहीही खाण्यास दिले नाही तरी चालते. मात्र, उन्हाळ्यात अधूनमधून पाणी देणे आवश्यक आहे. शेडमध्ये पिल्ले आल्यानंतर त्यांना गुळ पाणी द्यावे. कुठूनही पिल्ले घेताना ती काळजीपूर्वक घ्यावीत. पिल्ले स्वच्छ, चपळ आणि योग्य वजनाची सदृढ अशीच असावीत. एक-एक करून हळुवार पद्धतीने पिल्ले ब्रुडरखाली सोडावीत. घाईत सोडून पक्षांना ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. आठवड्यानंतर ब्रुडर गार्ड काढून घ्यावीत. हिवाळ्यात जास्त थंडीची लाट असल्यास बल्ब, इलेक्ट्रिक हिटर तसेच कोळश्याच्या शेगड्या ठेवाव्यात. शेड उबदार राहील याची काळजी घावी. अशा पद्धतीने शेडमध्ये पिल्लांचे स्वागत करावे. पिल्ले हीच पोल्ट्री फार्ममधील नफ्याचे गणित वाढवणारे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे त्यांची योग्य अशी काळजी घ्यावी. पिलांची काळजी आणि योग्य संगोपन करूनच आपल्या नफ्याचा पाया खर्या अर्थाने भक्कम होईल.

Advertisement

संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

(क्रमशः) वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply