Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Goat Farming Info: गोठ्याच्या बांधकामात ‘याकडे’ नक्कीच लक्ष द्या; नाहीतर होईल ‘हा’ परिणाम

कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गणित तो व्यवसाय इतर लोकांना कसा कसा दिसतो यापेक्षाही त्यातून नफ्याची टक्केवारी किती मिळते यावर ठरते. सध्या बेस्ट दिसणारा गोठा आणि सुंदर दिसणाऱ्या शेळ्या-बोकड यांच्यावर फोकस करून विविध माध्यमातून यशकथा फिरत असतात. अशावेळी कोट्यावधींची गुंतवणूक करून संबंधित व्यावसायिकांनी इतक्या हजारांना बोकड किंवा शेळी विकली याचेही दावे केलेले दिसतात. (Goat Farming business tricks and shed construction tips in Marathi information)

Advertisement

मात्र, वाचक मित्र-मैत्रिणींनो, त्याला अजिबात भुलू नका. आपणास जर पैदाशीचे बोकड किंवा शेळ्या करून विकायच्या आहेत, किंवा फ़क़्त शेळ्यांच्या खरेदी-विक्रीतून दलाली मिळवायची असेल तरच ग्राहकांना भुलवण्यासाठी अशा पद्धतीचे आकर्षक गोठे व शेळ्या यांच्यावर फोकस करा. अन्यथा आपणास लोकल मार्केटमधील व्यापाऱ्यांना जर बोकड व करडे विकायची असल्यास त्यानुसारच नियोजन करा. काहीजण अगदीच बॅटम पट्ट्या उंचावर लावून खाली लेंड्या पडतील असे नियोजन करून शेळीपालनातून कोट्यावधींचा नफा मिळण्याची आस लावतात. किंवा गोठ्यात शेळ्यांना मस्त मऊशार फरशीवर किंवा कॉंक्रीट कोब्यावर बसण्याचे स्वप्नरंजन करून गोठा बांधकामाचे नियोजन करतात. मात्र, आपणही जास्तवेळ एसीमध्ये बसल्यावर किंवा अगदी आरामशीरपणे खुर्चीत बसल्यावरही लवकर आजारी पडू शकतोच की नाही? उलट अशा वातावरणात आपण सवय नसल्याने जास्तच आजारी पडतो.

Advertisement

अगदी त्याच पद्धतीने कॉंक्रीटवर शेळ्यांना वातावरणीय उब व थंडपणा यांचा अजिबात फायदा होत नाही. अशावेळी मग शेळ्यांना सर्दी होऊन इतर समस्या वाढतात. अगदी त्याचा पद्धतीने बॅटम पट्ट्या उंचावर लावून त्यावर शेळ्या असल्यानेही वातारणातील जोरदार थंड हवा व उष्ण हवा यांचा शेळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो. या पद्धतीने काही नियोजन करायचे असल्यास मग हिवाळ्यात उष्णता आणि उन्हाळ्यात काहीअंशी थंडावा निर्माण होण्याचीही सोय करावी. मात्र, या हौशेसाठी जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेऊन नफ्याचा वाटा कमी करण्याची तयारीही मग ठेवावी लागेल.

Loading...
Advertisement

गोठ्याचे बांधकाम करताना लक्षात घेण्याचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

Advertisement
  • एका पूर्ण वाढलेल्या प्रौढ शेलीअसाठी सरासरी १.५० चौरस मीटर इतकी मोकळी जागा उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे.
  • तर, गाभण आणि दुभत्या शेळ्यांसाठी हेच सरासरी आवश्यक क्षेत्रफळ २ चौरस मीटर असावे.
  • कळपातील बेणूचा बोकड हा महत्वाचा घटक आहे. त्यालाही अशाच पद्धतीने २ चौरस मीटर जागा राहील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
  • कराडांनाही अशाच पद्धतीने मोकळी जागा ठेऊन गोठ्याच्या बांधकामाचे नियोजन करावे. कराडांना कमी जागा लागते. मात्र, त्यांना उद्या मारण्यासाठीची सोय केल्यास ते जास्त आनंदी राहतात.
  • तीन महिने वयाच्या कराडांना ०.६ चौरस मीटर, त्यापेक्षा मोठ्या व सहा महिन्यापर्यंतच्या कराडांना ०.८ ते ०.९ चौरस मीटर आणि सहा ते १२ महिने वयाच्या पूर्ण वाढीला लागलेल्या पाठ व बोकड यांना सरासरी १ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ फिरण्यासाठी राहील याची काळजी घ्यावी.
  • वरील गणित हे आतील गोठ्यामधील आहे. अर्धबंदिस्त शेळीपालन करताना मात्र, याच क्षेत्रफळाच्या दुप्पट जागा उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी.
  • अनेकजण शेळ्यांना अजिबात न बांधता त्यांना कप्प्यांमध्ये मोकळ्या सोडतात. ही एक चांगली पद्धत आहे. मात्र, अशावेळी आक्रमक असलेल्या मारक्या शेळ्या किंवा बोकड इतर प्राण्यांना अजिबात नुकसान करणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कुंपण करताना बाहेरून सहा फुट उंच तार आणि आतल्या कप्प्यांमध्ये चार फुट उंच तार वापरावी.
  • बाहेरून लांडगा किंवा भटकी कुत्री शेडमध्ये घुसणार नाहीत असे नियोजन करूनच कुंपण बांधावे.
  • मुख्य म्हणजे शेळीपालनातील उत्पादनखर्च कमी ठेवण्यासाठी आणि हा व्यवसाय नफ्यात येण्यासाठी मजबूत मात्र, कमी खर्चातील शेड, गोठा व कुंपण बांधण्याचे नियोजन करावे.

लेखन आणि संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः) वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply