Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ढगाळ हवामानामध्ये ‘घ्या’ ही महत्वाची काळजी; पहा कोणती कामे उरकण्याची आहे गरज

सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार (Weather Summary) सोलापूर जिल्ह्यामध्ये (Solapur District) दिनांक २२ मार्च २०२२ ते २७ मार्च २०२२ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ५३ ते ६३ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ३३ ते ४० % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग ताशी १२ किमी ते १४ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशावेळी कोणती काळजी घ्यावी याच्या सूचना मोहोळ येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा यांच्या जिल्हा कृषि हवामान केंद्र यांनी केल्या आहेत.

Advertisement

हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दिनांक २२ /०३ /२०२२ रोजी झाली. त्यानुसार हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला यामध्ये म्हटले आहे की, विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक २७ मार्च ते ०२ एप्रिल २०२२ दरम्यान  कमाल तापमान सरासरी पेक्षा अधिक (मध्यम) राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक (मध्यम) राहण्याची शक्यता आहे. यामध्ये जनावरांना थंड, स्वच्छ आणि शुद्ध पाणी द्यावे. दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा चारा पुरेश्या प्रमाणात उपलब्धकरून द्यावा.जनावरांच्या गोठ्यांवर वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. दुपारच्या वेळी गोठ्याच्या सभोवताली पाणी फवारावे. शक्य असल्यास गोठ्यामध्ये फॉगरचा वापर करावा. म्हशींना धर्मग्रंथी खूप कमी असल्याने व त्यांची त्वचा काळी असल्याने वाटणाऱ्या तापमानाचा गायींपेक्षा म्हशींना वासजास्त होतो म्हणून म्हशीना पाण्यात डुंबन्यास सोडावे. (Buffalos having very low sweat glands and their skin is black coloured thus they get more trouble due to increased temperature so allow Buffaloes for wallowing during summer season.) तसेच सामान्य सल्ला म्हणून म्हटले आहे की, (Harvest mature crops like sorghum, gram, wheat, Safflower etc.)

Advertisement
  • पक्व झालेली पिके ज्वारी, गहू , हरभरा, करडई इत्यादींची काढणी करून घ्यावी.
  • मळणी व काढणी केलेल्या पिकाची व धान्याची उन्हात चांगले वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • सध्याच्या हवामानात रब्बी पिकांना व फळ बागांना आवश्यकतेनुसार व उलब्धतेनुसार पाणीपुरवठा करावा.
  • शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव
  • आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • पिकावर कीटकनाशकाची, बुरशिनाशकाची फवारणी करतांना योग्यती खबरदारी व काळजी घ्यावी.
  • हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.
  • पिकावर कीटकनाशकाची, बुरशिनाशकाची फवारणी करतांना योग्यती खबरदारी व काळजी घ्यावी.
  • पक्व झालेली पिके ज्वारी, गहू , हरभरा, करडई इत्यादींची काढणी करून घ्यावी.

पीकनिहाय सल्ला असा :

Advertisement

सुरू ऊस (Sugarcane) : सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये खोड किडीमुळे शेंडे वाळत असतील, तर क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनील (०.३जीआर) १० ते १२ किलो प्रति एकरी वापरावे. अन्यथा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मार्च महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग ७.३३प्रति दिवस एवढा असतो ऊस पिकास दररोज ६.०६ लिटर पाण्याची आवश्‍यकता असते त्यासाठी ठिबक सिंचन संच (४ लिटरचा ड्रीपर) दररोज ०१ तास ३१ मिनिटे चालवावा.

Advertisement

उन्हाळी भुईमूग (Summer Groundnut) : (आर्‍या सुटण्याची अवस्था) भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीच्या मगदूराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ४० ते ४५ दिवसांनंतर आर्‍या सुटण्याची अवस्था असल्याने संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. ढगाळ वातावरणामुळे भुईमुग पिकात काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आल्यास नियंत्रणासाठी पिकावर क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Advertisement

करडई काढणी : रब्बी करडई पिकाची काढणी कंबाईन हार्वेस्टर द्वारा करून घ्यावी. करडईचे बियाणे पुढील हंगामात वापरावयाचे असल्यास पंख्याचा वेग ६०० ते ७०० आर. पी. एम. इतका ठेऊन धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

Advertisement

ज्वारी काढणीची अवस्था : रब्बी ज्वारी परिपक्व झाले असल्यास काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकाची मळणी करुन सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

Advertisement

हरभरा काढणी अवस्था : हरभरा पिक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. पिक ओलसर असताना काढणी करूनये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करून घ्यावी. धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

Loading...
Advertisement

गहू काढणी अवस्था : गहू परिपक्व झाला असल्यास काढणी करून घ्यावी. गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हारवेस्टर मशीनने करावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करुन सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

Advertisement

मका काढणीची अवस्था : रब्बी मका पीक परिपक्व झाले असल्यास काढणी करून घ्यावी.काढणी झालेल्या पिकाची मळणी करुन सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

Advertisement

कांदा (Onion) : ढगाळ वातावरणामुळे फुलकिडे व करपा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १५ मिली किंवा लॅम्बडासायहेलोथ्रिन ६ मिली + टेब्युकोनॅझोल १० मिली + स्टिकर १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Advertisement

टरबूज / खरबूज पिक वाढीची अवस्था : ढगाळ वातावरणामुळे नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर नियंत्रणासाठी प्रोपेनोफोस २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच फळ माशीच्या नियंत्रणासाठी क्युलूर चे एकरी ५ सापळे लावावेत.

Advertisement

द्राक्ष पक्वता ते काढणी अवस्था : सध्याच्या पक्वता ते काटणी अवस्थेमध्ये हवामानातील तापमान वाढत असल्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा त्याचा परिणाम घडावर होवून ते घट्ट राहणार नाही आणि मालाची प्रत ढासळेल.

Advertisement

डाळिंब (Pomegranate) खोड किडीचे व्यवस्थापन : प्रतिबंधात्मक उपाय: खोडावर लेप लावणे :- दोन वर्षापुढील बागेत बहार घेण्यापूर्वी फळांची काढणी झाल्यानंतर जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर/फांदीवर पुढील प्रमाणे लेप लावावा. १० लिटर पाण्यामध्ये लाल माती ४ किलो + एमामेक्टिन बेंझोएट ५% एस जी २० मिली + कॉपर ओक्झिक्लोराइड ५०% ड्ब्लु पी २५ ग्रॅम हा लेप १० % बोर्डो मिश्रणासोबत फेर पालट करून वापरावा.

Advertisement

Agromet Advisory Bulletin of Solapur District Prepared by District Agromet Unit (DAMU) Working at Krishi Vigyan Kendra,Mohol,Dist. Solapur (Solapur-II)  For your information and Further needful.

Advertisement
Advertisement

Leave a Reply