Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कांदा चाळीचे बांधकाम करताना घ्या ‘ही’ काळजी; पहा कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते

सोलापूर : सध्या कांदा (Onion in Maharashtra) या पिकाला पुन्हा एकदा बरा भाव मिळत आहे. मात्र, सरकारी धोरण (Government Policy) आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा याला कधीही फटका बसू शकतो. एकाच निर्णयात आपला कष्टाने उत्पादित केलेला कांदा मातीमोल होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारणी करावी. त्यासाठी कृषी विभाग (Agriculture Department) आणि इतर सरकारी विभागाकडून मिळणाऱ्या अनुदान योजनांचा (Govt. Subsidy scheme for Onion Storage) योग्य तो लाभ घ्यावा. अशावेळी कांदा चाळ उभारणी करताना घेण्याच्या काळजीचे मुद्दे असे :

Advertisement
 • सुधारीत पद्धतीनुसार कांदा चाळींमधील कांद्याला सर्व बाजूंनी हवा खेळती राहील या दृष्टीने आराखडा तयार केले आहेत. अनुदानास पात्र चाळींची उभारणी करताना खालील बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे.
 • जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट काँक्रेटचे पिलर/कॉलम उभारणे आवश्यक आहे.
 • कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. तथापी, ज्या भागात अती आर्द्रता असते अशा भागात खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधंनकाराक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी.
 • या पिलर/कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा.
  4 एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्र अथवा मेंगलूर कवले यांचा वापर करावा. शक्यतो लोखंडी पत्र्याचा वापर टाळावा, वापर केल्यास त्याला आतील बाजूस पांढारा रंग द्यावा. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू अथवा तत्सम लाकडी पट्टा यांचा वापर करावा. तर पाया आर.सी.सी. खांब/स्तंभ उभारुन करावा.
 • 25 मे.टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट (12 मी), प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट (20 मी), बाजुची उंच 8 फुट (2.4 मी) मधली उंच 11.1 फुट (3.35 मी), दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंद 5 फुट (1.50 मी), कांदाचाळीची एकुण रुंद 4 अ 5 अ 4 उ 13 फुट (3.9 मी) अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट (1.20 मी) पेक्षा जास्त नसावी. 50 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील.
 • कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी.चाळाच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा. कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे.

आपण कांदा चाळ उभारणी करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहिले आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात, यासह कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचेही गणित व्यवसायात लक्षात घ्यावे लागते. आता आपण कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत याबाबत पाहूया.

Loading...
Advertisement
 • कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी.
 • हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे.
 • कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
 • निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये.
 • वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी.
 • कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा.

Advertisement

Leave a Reply