Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कांदाचाळ योजना : योजेनासाठी अर्ज करण्यापूर्वी वाचा ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा कसा करायचा आहे अर्ज

कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. मात्र, ऐनवेळी कांदा हे राजकीयदृष्ट्या खूप सेन्सेटिव्ह असे पिक आहे. त्यामुळे याचे भाव वाढले की लगेच कमी करण्यासाठी केंद्र सरकार सरसावलेले असते. अशावेळी कांदा चाळीत आपला कांदा सुरक्षित राहू शकतो. त्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सध्या अशी अनुदान मागणी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपाची झालेली आहे. त्यामुळे असे अर्ज भरण्यास सुरुवात झाली की तातडीने आपण अर्ज भरावा.

Advertisement

महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा हा नाशवंत आहे. परंतु भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा अविभाज्य भाग आहे. जून ते ऑक्टोंबर, प्रसंगी फेब्रुवारी पर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची गरज भासते.  खरीप हंगमामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो म्हणून किंवा रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कांदा ही एक जिवंत वस्तू आहे. तिचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे.

Loading...
Advertisement

पारंपारिक पध्दतीने कांदाचाळीची उभारणी करताना खर्चात जरी बचत होत असली तरी साठवणुकीतील होणारे नुकसान हे मोठा प्रमाणात असल्यामुळे एकंदरीत या चाळी आर्थिकदृष्टा सक्षम होत नाहीत. त्यामुळे कांद्याच्या शास्त्रोक्त चाळी उभारण्यासाठी ‘शेतक-यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यात कांदाचाळ योजना राबविण्यात येते. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि इतर काही योजनाद्वारे यासाठी शेतकऱ्यांना अर्थसाह्य मिळू शकते. यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सातत्याने संपर्कात राहणे आवश्यक असते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply