Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agri Info : सुत्रकृमीच्या तपासणीसाठी ‘असा’ घ्यावा लागतो नमुना

सुत्रकृमी किंवा निमॅटोड हा शेतीमधील सर्वाधिक चिंतेचा विषय झालेला आहे. यास राऊंड वर्म, ईलवर्म अशा नावांनीही ओळखले जाते. भाजीपाला पिके, फळ बागा, फुलशेती यासह मुख्यत्वे डाळिबं पिकातील निमॅटोडमुळे होणारे नुकसान हे सध्यातरी सर्वाधिक चर्चेत राहीले आहे. त्यामुळे आज आपण याबाबत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत.

Advertisement

डाळिंब फळबागेत सुत्रकृमी नियंत्रणासाठी फोरेट 20 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळून द्यावे लागते. मात्र, आता यावर बंदी आलेली आहे. म्हणून आंतरपीक म्हणून झेंडू लागवड करावी किंवा उन्हाळ्यात ड्रिपरजवळ झेंडू रोपांची लागवड करावी. सुत्रकृमी लांब धाग्यांप्रमाणे असून उघडया डोळयाने दिसू शकत नाही. सुत्रकृमींची लांबी 0.20 ते 1.10 मिलीमीटर असून व्यास 0.005 ते 0.01 मिलीमीटर असते. मादी सुत्रकृमी चंबुच्या आकाराची असते. सुत्रकृमीमुळे झालेल्या जखमांतून रोगकारक बुरशी झाडांमध्ये प्रवेश करते. त्यामुळे पिक विविध प्रकारच्या रोगांना बळी पडते.

Loading...
Advertisement

सुत्रकृमी परीक्षणासाठी माती व मुळांचा नमुना तपासणीला पाठवण्यासाठी प्रथम शेतामधील बांधाकडील 1 मीटर अंतर सोडून नमुना घ्यायची ठिकाणे निश्चित करा. नमुना घेण्यापूर्वी या ठिकाणची माती थोडी ओलसर असावी. नमुना घेण्याच्या ठिकाणचा 2-3 सेंटीमीटर जाडीचा वरचा थर हाताच्या सहायाने बाजूला करावा. त्या ठिकाणी 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घेऊन त्या ठिकाणाहुन 50 ते 100 ग्रॅम मुळांसहीत मातीचा नमुना घ्यावा. अशा प्रकारे एकरी 4 ते 5 ठिकाणाहून मातीचा नमुना घ्यावा. नमुना घेताना नागमोडी पद्धतीने घ्यावा. घेतलेले सर्व नमुने एकत्र करून पॉलीथीन पिशवी मध्ये भरून पिशवीचे तोंड दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. अहवाल आल्यावर मग त्यानुसार तज्ञांच्या सल्ल्याने यावर कार्यवाही करावी.

Advertisement

Advertisement

Leave a Reply