Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून आता लोकांनी भाजपला मतदान करू नये.. पहा, लोकांना कुणी केलेय ‘हे’ आवाहन

दिल्ली : शेतकरी आंदोलन मागे घेतल्यानंतरही भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. आता तर 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे टिकेत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच शेतकरी नेत्यांनी निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन केले आहे. टिकेत यांनीही शुक्रवारी जनतेला भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले. वास्तविक, आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी भाजपला शिक्षा भोगावी लागणार असल्याचे सांगितले.

Advertisement

राकेश टिकैत म्हणाले, की “अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या, पण तोटा झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येकाला हा प्रश्न पडेल, जो कोणी मते मागायला येईल तो त्यांना विचारेल की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?” दरम्यान, टिकैत यांनी ट्विटरवर एक निवेदनही जारी केले आहे. ‘या निवडणुकीत शेतकरी विरोधी भाजपला शिक्षा द्या’ असा त्याचा मथळा आहे. त्याचवेळी शेतकरी नेते राकेश टिकट यांनी कु (KOO) या सोशल साइटवर लिहिले की, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आंदोलने होत राहतील.

Advertisement

याआधी मंगळवारी राकेश टिकैत यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पावर म्हटले होते की, सरकारने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. सरकारने एमएसपीचे बजेट कमी केल्याचेही ते म्हणाले. सरकार एमएसपीवर खरेदी करू इच्छित नाही असे दिसते. टिकैत यांनी कु या सोशल साइटवर लिहिले की, “आज अर्थसंकल्पात मोदी सरकारने एमएसपीच्या बजेटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय कपात केली आहे. 2021-22 मध्ये, MSP वर खरेदीचे बजेट 248000 कोटी होते, जे 2022-23 च्या बजेटमध्ये कमी करून 237000 कोटी करण्यात आले, तेही फक्त धान आणि गहू खरेदीसाठी. सरकारला एमएसपीवर इतर पिके खरेदी करायची नाहीत असे दिसते.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत.  याआधी काही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांतही शेतकरी आंदोलनाचा परिणाम जाणवला. काही ठिकाणी भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. आता या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

‘त्या’ आरोपांना अखेर टिकैतांनी दिले उत्तर; वाचा, खरच आहे का टिकेत यांच्याकडे करोडोंची संपत्ती आणि मॉल

Advertisement
Advertisement

Leave a Reply