Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारने घेतलाय महत्वाचा निर्णय; सहा हजार ग्रामपंचायती देणार महत्वाचे अपडेट

पुणे : हवामानाचा अंदाज मिळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचेच आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना हवामानाचा योग्य अंदाज मिळावा, पिकांची काळजी घेण्यासाठी काय महत्वाचे आहे, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 5 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहेच पण होणाऱ्या पावसाची योग्य नोंद नसल्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे आता गावनिहाय पावसाचे प्रमाणाची नोंद या हवामान केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. उलट वेगवेगळ्या बाबींमध्ये या हवामान केंद्राचा फायदाच शेतकऱ्यांना होणार आहे. पाऊस, वारा, अवकाळी यामुळे होणाऱ्या नुकसानीची नोंद ही तंत्रशुध्द पध्दतीने होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकी दरम्यान सांगितले.

Advertisement

राज्यात सध्या महसूल मंडळांच्या ठिकाणीच हवामान केंद्रे आहेत. जवळपास दोन हजार केंद्र बऱ्याच आधी सुरू केली आहेत. यातील काही बंदही पडली आहेत. त्यामुळे तापमान आणि पावसाची माहिती योग्यरित्या नोंदली जात नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो. बऱ्याचदा अनेक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. काही वेळेस मदत मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे आता या अडचणी दूर करण्याचे सरकारने ठरवलेले आहे. 5 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत पातळीवर हवामान केंद्र सुरू होणार आहेत. ग्रामपंचायत ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे.

Advertisement

शेतकरी आंदोलनाचा इफेक्ट..! ‘या’ राज्यात भाजपला जोरदार झटका; काँग्रेसचा दणदणीत विजय

Advertisement
Advertisement

Leave a Reply