Take a fresh look at your lifestyle.

थेट मोदी-शहांनाच आव्हान..! पहा नेमके काय म्हटलेय वरून गांधींनी

दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी सध्या चर्चेत आहेत. आपल्या वक्तव्यातून आपल्याच सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन असो की तरुणांचे प्रश्न, त्यांच्या प्रश्नांनी केवळ मथळेच बनवले नाहीत तर सरकारलाही कोंडीत पकडले आहे. वरुण गांधींकडूनही विरोधकांना बळ मिळत आहे. त्यांचे प्रश्न उपस्थित करण्यामागे त्यांचा हेतू काय आहे, पक्षाच्या कोणत्याही रणनीतीनुसार ते हे करत आहेत का, भविष्यात त्यांचा राजकीय मार्ग काय असू शकतो, हे सर्व जाणून घेण्यासाठी नवभारत टाईम्सचे विशेष प्रतिनिधी नरेंद्र नाथ यांनी वरुण गांधी यांच्याशी बातचीत केली. त्यात त्यांनी आपल्याला बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाच हे थेट आव्हान असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

तुम्ही स्वतंत्र आवाज म्हणून शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न सातत्याने मांडत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांनी मला खासदार म्हणून निवडले आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलणे हे माझे लोकशाही कर्तव्य आहे. जर मी जनतेचे प्रश्न मांडणार नाही, तर निवडणूक लढवण्यात, खासदार होण्यात किंवा राजकारण करण्यात अर्थ नाही.तर, तुम्ही असे अनेक मुद्दे उपस्थित केलेत, ज्यामुळे तुमचाच पक्ष आणि सरकार अस्वस्थ झाल्याचे बोलले जात होते. तुमचा काही विशिष्ट हेतू आहे का, यावर उत्तर देताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, पक्षाच्या किंवा सरकारच्या सोयीसाठी किंवा कोणाला अस्वस्थ करण्यासाठी मुद्दे मांडले जात नाहीत. वर्षभरापासून शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू होते, ते रस्त्यावर बसले होते. यामध्ये 700 हून अधिक शेतकरी शहीद झाले. त्याची वेदना समजायला हवी होती, म्हणूनच मी बोललो. आपल्या देशात लोकशाही आहे हे समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्यानेही भाजपला मतदान केले होते. एवढ्या मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष करून कोणताही पक्ष राजकारणात टिकू शकत नाही. शेवटी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने कायदे मागे घेण्यात आले. हा लोकशाहीचा विजय आहे. यामुळे लोकशाही मजबूत झाली आहे.

Advertisement

पक्षनेतृत्वाशी तुमचा काही संवाद झाला आहे का, यावर त्यांनी म्हटलेय की, बघा, मी भीतीपोटी किंवा वैयक्तिक फायदा-तोट्याने राजकारण करत नाही. जर तुम्ही जनतेचे प्रश्न मांडू शकत नसाल तर अशा राजकारणाला काही अर्थ नाही. मी जनतेच्या हितासाठी बोललो तर कोण थांबणार, कोण रोखणार? पक्षात संवाद सुरू आहे. माझ्या विचारांचे पालन करूनच पक्षाला फायदा होईल. ‘तुम्ही उत्तर प्रदेशचे खासदार आहात. तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्र लिहिले होते. त्याला कधी उत्तर मिळाले का’ यावर गांधी यांनी टोला लगावताना म्हटले की, उत्तरापेक्षा ते सोडवले पाहिजेत हे महत्त्वाचे आहे. तसेच तरुणाई, शेतकऱ्यांची नाराजी किंवा महागाई याचा परिणाम पाच राज्यांच्या निवडणुकीत दिसून येईल का, यावर ते म्हणाले की, लोकांच्या मुद्द्यांचा निवडणुकांवर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य नसून केवळ काही मुद्द्यांवरच निवडणुकीत विजय-पराजय होतो. मतदार अनेक गोष्टी लक्षात घेऊन निवडणुकीत मतदान करतात. मुद्द्यांचा परिणाम होईल, पण कोणत्या मुद्द्यावर काय परिणाम होईल हे सांगणे फार कठीण आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply