Take a fresh look at your lifestyle.

IMP Info. : म्हणून गरज आहे कपाशीतील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनाची

कापूस हे औद्योगिकदृष्टया भारतातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाखाली जवळपास ४१ लाख हेक्टर क्षेत्र असुन विदर्भ विभागात १५ ते १६ लाख हेक्टर क्षेत्र आहे. कापसाला विदर्भात “ काळया मातीतील पांढरे सोने” म्हणुन संबोधण्यात येते. कापड उद्योगाला लागणारा कच्चा माल (रूई) कापसापासून मिळतो. कापूस पिकाच्या क्षेत्रा बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो परतू उत्पादकतेचा विचार केल्यास ती जगातील इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत कमी आहे. आपल्या देशात कपाशीची उत्पादकता कमी असण्याची जी प्रमुख कारणे आहे त्या पैकी एक म्हणजे कापूस पिकाचे दरवर्षी किडीमूळे होणारे नुकसान.

Advertisement

लेखक : आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर (मो. ९१४६९६६२२२; कृषीमित्र, यवतमाळ)

Advertisement

आपल्या भागात आढळून येणाऱ्या किडींची त्यांच्या नुकसानीच्या प्रकारावरून दोन गटात विभागणी करता येईल. पहिल्या गटात येणाऱ्या किडी म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी इत्यादी. तर, रस शोषक किडी आणि दुसऱ्या गटात येणाऱ्या किडी म्हणजे हिरवी बोंडअळी, ठिपक्याची बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी. फार मोठया प्रमाणावर बी टी कपाशीची लागवड शेतकरी करीत असल्यामुळे दुसऱ्या गटात येणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरीता लागणाऱ्या फवारण्यामध्ये घट झाली. परंतु बऱ्याचअंशी त्यांची जागा सुक्ष्म अन्नद्रव्ये व वाढ संप्रेरकांच्या फवारण्यांनी घेतली आहे. यामुळे पीक कोवळे व लुसलुसीत होते व सुरवातीला दुय्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस शोशक किडींच्या प्रादुर्भावामध्ये फार मोठया प्रमाणात वाढ झाली. संपुर्ण बी टी कपाशी उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात न करता आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल केले. याचा परीणाम असा झाला की, ज्या बोंडअळयांच्या व्यवस्थापणाकरीता बी टी तंत्रज्ञान तयार करण्यात आले. त्या बोंडअळयांचाच प्रादुर्भाव बी टी कपाशीवर आढळून येत आहे. याकरीता  हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमीतकमी राखण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापण राबवणे अत्यावश्यक आहे.

Advertisement

ओळख :

Advertisement
 • गुलाबी बोंडअळीचा पतंग लहान असुन तो गर्द राखाडी रंगाचा असतो आणि पंखावर बारीक काळे ठिपके असतात.
 • गुलाबी बोंड अळीची अंडी लांबुळकी परंतु चपटी असुन सुरूवातीला मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात.
 • अंड्यातून बाहेर आलेली अळी प्रथम पांदूरकी असते . मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते . गुलाबी बोंड अळीला शेंदरी बोंड अळीसुध्दा म्हणतात .
 • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या एकदम बोंडात शिरल्यानंतर बोंडातच अळी अवस्था पूर्ण करते . त्यानंतर बोंडाला गोल छिद्र करून कोषावस्थेत जाण्यासाठी बाहेर पडते व जमिनीवर पडलेल्या पाला पाचोळ्यात किंवा ढेकळाखाली किंवा उमललेल्या बोंडातील कापसावर कोषामध्ये जाते .
 • या बोंड अळीची वाढ साधारणत : उष्ण व ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरीची जोड असल्यास झपाट्याने होते .

नुकसानः

Advertisement
 • प्रादुर्भाव झालेली फूले अर्धवट उमलले ल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच ‘ डोमकळी ‘ म्हणतात .
 • या बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो . एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छिद्र बंद होत असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही . परंतू हिरवी बोंडे फोडून पाहिल्यानंतर आतमध्ये गुलाबी रंगाच्या अळ्या दृष्टीस पडतात .
 • प्रादूर्भावग्रस्त बोंडे परिपक्क न होताच उमलतात . त्यामुळे कपाशीची प्रत बिघडते .
 • बोंडातील अळ्या रूईचे नुकसान करुन सरकी खातात .
 • एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळ्या आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात . त्यामुळे रूईची प्रत खालावते . सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते .

कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे

Advertisement
 • बी टी कपाशी बियाण्याच्या पाकिटामध्ये दिलेल्या रेफुजी ( नॉन बी टी ) बियाण्याची लागवड न करणे .
 • बीटी कपाशीच्या संकरीत वाणांची ठिबकवर हंगामाआधी खुप लवकर लागवड करणे . ज्यामुळे आधीच्या हंगामामधील एप्रील – मे पर्यंत लांबलेल्या पिकावरील गुलाबी बोंड अळ्यांना लगेच खाद्यपुरवठा उपलब्ध होणे .
 • दिर्घ कालावधीच्या बीटी कपाशीच्या संकरीत वाणांची लागवड .
 • बहुसंख्य संकरीत वाणे , फुले व फळे लागण्याच्या विविध कालावधीसह ( १७०-२०० दिवस ) लागवडीकरीता बाजारात मिळत असल्यामुळे मुबलक खाद्यपुरवठा उपलब्ध .
 • कपाशीचे पिक नोव्हेंबर नंतर सुध्दा ( फरदड ) घेवून पिकाचा कालावधी एप्रील – मे पर्यंत लांबवणे .
 • प्रादुर्भाव ओळखुन वेळेवर व अचुक व्यवस्थापणाची सुरवात न करणे .
 • मोनोक्रोटोफॉस आणि अॅसीफेट मिश्रणाची सुरवातीच्या काळात वारंवार ( ३ ते ४ ) फवारण्या करणे . यामुळे पिकाचा पात्या व फुले लागण्याचा कालावधी वाढतो व परीपक्वता लांबते . भरपुर फुले जास्त दिवस उपलब्धते मुळे बोंडअळ्यांचे पतंग आकर्षित होतात व यामुळे प्रादुर्भाव जास्त आढळून येतो .
 • जिनिंग फॅक्टरीमध्ये खुप दिवस कच्चा कापुस पडून राहणे . यामध्ये गुलाबी बोंड अळीच्या बंद हंगामात पिढ्या जीवंत राहतात व येणाऱ्या हंगामात नविन पिकावर सुरवातीलाच आक्रमण करतात .

गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Advertisement
 • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरटी करावी . त्यामुळे किडींच्या जमिनीतील सुप्तावस्था नष्ट होतील .
 • पिकाची फेरपालट करावी . एकाच क्षेत्रावर वारंवार कपाशीचे पीक घेणे टाळावे .
 • येत्या हंगामात गुलाबी बोंडअळीचे जिवनचक्र खंडित करण्याकरिता पुर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी .

कपाशीचे कमी कालावधीचे ( १५०-१६० दिवस ) बीटी करावी . अथवा सरळ वाणांची मान्सूनच्या पावसावर लागवड करावी.

Advertisement
 • बीटी बियाण्यासोबत दिलेले नॉन बी.टी. ( रेफ्युजी ) ची आश्रय पीक म्हणून लागवड करावी .
 • पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ फेरोमोन सापळे लावावेत . पिकापेक्षा एक ते दिड फुट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंड अळींचे लिंग प्रलोभने ( ल्यूर ) गॉसीप्ल्यूर बसवावेत . हे , लिंग प्रलोभने दर तिन आठवड्याच्या अंतराने बदलावे . या सापळ्यामधे २ ते ३ दिवस सतत ८-१० पतंग आढळून आल्यास त्वरीत व्यवस्थापणाचे उपाय योजावेत .
 • गुलाबी बोंड अळ्याच्या व्यवस्थापणाकरीता पीक पातीवर आल्यानंतर १० दिवसाच्या अंतराने एकरी तीन ट्रायकोकार्ड ७-८ वेळा पिकात लावावे . ( १.५ लाख अंडी / हेक्टर ) .

पिकात फुलोरावस्था सुरु झाल्यापासून प्रादुर्भावग्रस्त फुलें ( डोमकळ्या ) शोधून नष्ट करावेत . पाती व बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये ५ टक्के निंबोळी अर्काचा फवारा करावा म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत होईल . वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविक बुरशी बिव्हेरीया बॅसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात पाती व फुले अवस्थेवर फवारणी करावी .

Advertisement
 • नियमीत बीटी कपाशीच्या शेताचे सर्वेक्षण . कपाशीचे पीक पातीवर आले म्हणजे , आठवड्यातून एक वेळा शेतातील १२ ते २४ झाडांचे निरीक्षण करावे ( क्षेत्रावर अवलंबून ) . ही झाडे शेताचे प्रतीनिधीत्व करतील अशी निवडावीत . या झाडावरील एकदर पात्या , कळ्या , फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत आणि यापैकी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त किती आहेत ती काळजीपूर्वक पाहून मोजावीत . नुकसानीचे प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास गुलाबी बोंड अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती उपाययोजना करावी .
 • बी टी कपाशीच्या शेतात हिरवी बोंडे फोडून नियमीत सर्वेक्षण करणे व १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे उस आढळल्यास व्यवस्थापणाचे उपाय आमलात आणणे .
 • क्विनालफॉस २५ ईसी २० मिली किंवा थायडीकार्ब ७५ डब्ल्यु पी २० ग्रॅम या किटकनाशकाचा पिकाच्या सुरवातीच्या काळात गरज भासल्यास उपयोग करणे व नंतरच्या काळात आर्थिक नुकसान पातळी ( १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे ) ओलांडल्यानंतर फेनवलरेट २० ईसी १० मि ली किंवा सायपरमेथ्रीन १० ईसी १० मिली १० लोटर पाण्यात मिसळून फवारणी करणे .
 • नोव्हेंबरच्या आधी या अळीच्या व्यवस्थापनाकरीता सिन्थेटिक पायरेथाईडसचा वापर कटाक्षाणे टाळावा जेणेकरून पांढरी माशीचा उद्रेक होणार नाही .
 • कपाशीचे पिक जानेवारीच्या आत संपवणे . फरदड पीक घेवू नये .
 • कपाशीची शेवटची वेचणी संपल्यानंतर लगेच शेतात जणावरे उदा . शेळ्या , मेंढ्या , गाई म्हशी ई . सोडाव्यात म्हणजे त्या कपाशीच्या झाडावरील कीडकी बोंडे , पाने ई खाऊन टाकतील त्यामूळे त्यामध्ये असणाऱ्या किडीच्या अवस्था नष्ट होतील .
 • उपटलेल्या पहाटयाचा ढीग शेतात तसेच न ठेवता त्यांचा वापर कंपोष्ट तयार करण्यासाठी करावा म्हणजे त्यामधे असलेल्या किडींच्या सुप्त अवस्थांचा नाश होईल .
 • मार्केट स्थळी , जिनिंग फॅक्टरीमध्ये कामगंध सापळे लावल्यास हंगामा नंतरचे पतंग नष्ट करण्यास मदत होते .

Advertisement

Leave a Reply