Take a fresh look at your lifestyle.

कपाशीच्या बोंडअळीला बसणार झटका; पहा नेमके काय आहे ‘प्रोजेक्ट बंधन’..!

नागपूर : कपाशी उत्पादकांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे बोंडअळी. याच अळीच्या धाकामुळे अनेक शेतकरी मानसिकदृष्ट्या खचलेले दिसतात. अशा अळ्यांना झटका देण्यासाठी आता एक वेगळाच प्रोजेक्ट विदर्भात राबवला जात आहे. त्याचे नाव आहे ‘प्रोजेक्ट बंधन’,

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातल्या वरोडा व आदासा येथे जोधपूर येथील दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या वतीने व नागपूरच्या अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट बंधन’ राबवण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीपासून कपाशीला वाचवण्यासाठी हा देशातील सर्वात मोठा क्षेत्रीय प्रयोग आहे. यामध्ये परिसरातील ३०० एकरांत पसरलेल्या शेतातील कपाशीवर नावीन्यपूर्ण ‘वीण व्यत्यय’ तंत्राचा वापर केला जात आहे.

Advertisement

कपाशीच्या झाडांचे बोंडअळीपासून संरक्षण व्हावे यासाठी रक्षाबंधन करण्याच्या या प्रकल्पाचे त्या भागातील शेतकऱ्यांनी दणक्यात स्वागत केले आहे. गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग म्हणून कीटकांच्या संख्येची गतिशीलता, कीटक पर्यावरण व किती नुकसान झाले याचा या माध्यमातून अभ्यास होईल. बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शेतकरीस्नेही प्रकल्प राबवला जात आहे.

Advertisement

पीबीकेनॉटच्या फेरोमेन जाळीला असलेला सुगंध आसपासच्या वातावरणात पसरवणे आणि त्याद्वारे नर बोंडअळीला उत्तेजित करून मादीच्या शोधात आलेल्या नर बोंडअळीची दिशाभूल करणे असा हा प्रकल्प आहे. नर-मादी मिलन होण्यापासून पीबीकेनॉट प्रतिबंध करणार असून अंडी घालण्याची प्रक्रिया मंदावेल व गुलाबी बोंडअळीची भविष्यात संख्या नियंत्रणात येईल असा हा प्रयोग आहे.

Advertisement

सॉलिड मेट्रिक डिस्पेन्सर दोऱ्याच्या स्वरूपात उपलब्ध असून हा दोरा कापसाच्या रोपाला सहजरीत्या बांधता येतो. फुले येण्याच्या काळात, बोंड तयार होईपर्यंतच्या महत्त्वपूर्ण अशा ९० दिवसांच्या काळात पीबीकेनॉट कापूस झाडांचे संरक्षण करेल. यामुळे बोंडांचे नुकसान कमी होऊन कापसाची गुणवत्ता सुधारण्यासह उत्पादन वाढेल असे दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे संचालक भगीरथ चौधरी यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply