Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेट अँड वॉच..! राज्यात पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार.. पहा हवामान विभाग काय म्हणतोय..?

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने पुढील 6 ते 7 दिवस मॉन्सूनची आगेकुच होण्याची शक्यता नाही.

Advertisement

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्यात पुढील चार दिवसांत कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. सर्वदूर पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

मागील 24 तासांत संगमेश्वर, देवरुख येथे 100 मिलीमीटर, जव्हार 90, वसई 80, हर्णे, विक्रमगड 50, तर मध्य महाराष्ट्रातील ओझर खेडा 80, दहीगाव 70, जामनेर, निफाड, साक्री 60, अकोले, नेवासे 50, बोडावद, पाचोरा, पारोळा, संगमनेर, सटाणा, बागलाण येथे 40 मिमी पाऊस पडला. काही ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.

Loading...
Advertisement

मंगळवारी दिवसभर महाबळेश्वर, नागपूर येथे हलका पाऊस झाला. पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply