Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : म्हणून आमच्याकडे यशकथा बंदी.. जुगरकथा नकोत.. चूक-बरोबर हे काळ ठरवेल..!

‘काय चालूये सध्या?’, आज मार्केटमध्ये खूप वर्षांनी भेटलेल्या एका पत्रकार मित्राने विचारले. मास्क काढून मीही म्हटलं, ‘काही नाही कृषीरंग एके कृषीरंग.. बाकी काहीच नाही..’

Advertisement

‘अरे.. हो.. वाचतो की मीही.. पण यशोगाथा नाही का देत तुम्ही,’ त्याने विचारले. मीही चहाची ऑफर करीत प्रत्युत्तर दिले..

Advertisement

म्हटलं ‘आमच्याकडे यशकथा बंदी आहे. शेतीत काही अपवाद आहेत पैसे कमावलेले. नवीन तरुणाईही यश मिळवते. पण एकूण नियम लक्षात घेता शेती म्हणजे आतबट्ट्याचा धंदा. अगोदर काही यशकथा केल्या. पण मग अक्कल आली की..! शेतीतल्या यशकथा ९९ टक्के बोगस असतात..’ त्याने म्हटलं, ‘काहीतरीच काय..!’

Advertisement

मी म्हटलं, ‘पत्रकार म्हणून तुम्ही कोणाच्या यशकथा केल्या? राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी, महसूल कर्मचारी, बाजार समितीचे संचालक, कृषी दुकानदार, अडत्या, व्यापारी (शेती व कोणत्याही क्षेत्रातील), वाळूवाला, दारूवाला, धाबेवाला आणि इतर तस्करांच्याच यशकथा करतो की आपण. त्यांनाच शेतीत यश मिळते. कारण, ओतायला जास्त पैसे असतात. आणि नाहीच शेतीत नफा झाला तरी इतर काळे पैसे आयकराच्या मार्गाने इकडे पांढरे होतात.. बरोबर ना..?’

Loading...
Advertisement

त्यानेही होकारार्थी मुंडी हलवली आणि चहाचा घोट घेतला. ‘असल्या तस्करांच्या यशकथा करण्यापेक्षा आम्ही केलीच तर शेतीकथा करतो. त्यात व्यथाही मांडतो. काही अपवाद आहेत. पण त्यांच्याकडेही काहीतरी वेगळे असतेच. शेतीत कष्ट करून भाव वाढण्याची लॉटरी लागली तरच पैसा मिळतो आणि काहींची यशकथा बनते. मग त्याला जुगरकथा म्हणूयात की.. ती करूया..’, मीही बकरा ऐकतोय म्हटल्यावर दिले ठोकून..

Advertisement

‘पत्रकार.. आता बास.. मीही यशकथेच्या नादी नाही लागणार बुवा शेतकऱ्यांच्या..’ त्यानेही प्रत्युत्तर दिले. मी म्हटलं, ‘असं नाही.. करावी.. पण सगळ्या बाजू तपासून घेऊन अशी यशोगाथा करावी.. नाहीतर शेतकऱ्यांना फसवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही यार.. आपले चूक की बरोबर माहित नाहीत.. काळच त्यावर उत्तर…’

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply