Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, ‘या’ चुका करु नका, नाहीतर 2 हजार रुपयांना मुकाल.. चुका दुरुस्त करण्यासाठी वाचा..!

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दरमहा 2 हजार रुपये दिले जातात. मात्र, पात्र असतानाही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचेही समोर आले आहे. अशा शेतकऱ्यांकडून आता या रकमेची वसूली सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना राबविली जाते. त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवले जातात. कमीत कमी 2 हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना हे पैसे पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 हप्ते देण्यात आले आहेत.

Advertisement

दरम्यान, पात्र असतानाही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांनी अनेकदा अर्ज करूनही ही मदत सुरू झालेली नाही. याबाबत माहिती घेतली असता, कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जात अनेक चुका आढळल्या आहेत. त्यामुळे हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करता आलेली नाही. शेतकऱ्यांनी या चुका सुधारण्याची गरज आहे.

Advertisement

शेतकऱ्यांकडून झालेल्या चुका..

Advertisement
  • अर्जावर शेतकऱ्यांनी आपले नाव इंग्रजीमध्येच लिहिणं आवश्यक आहे. इतर भाषेत नाव लिहिल्यास ते बदलणं गरजेचं आहे.
  • शेतकऱ्याचं खातं आणि अर्जावरील नावात ‘स्पेलिंग मिस्टेक’ नसावी.
  • बँकेचा IFSC कोड लिहिण्यात चूक करू नका.
  • बँक खात्याची माहिती देताना कोणतीच चूक करू नका.
  • तुमचा पत्ता, गावाच्या नावाची स्पेलिंगही तपासा.

अर्ज भरताना या चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करता येतील. त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. तेथे ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक करा. नंतर ‘आधार एडिट’च्या लिंकवर क्लिक करा. नंतर आधार क्रमांक दुरुस्त करा. खातेक्रमांक चुकीचा असेल, तर तोही दुरुस्त करू शकता. कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी संपर्क करुन चुका दुरुस्त करता येतील.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply