Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील ‘त्या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; चक्रीवादळ वेगात, पहा काय आहे परिस्थिती

पुणे : तौक्ते चक्रीवादळानंतर देशात यास चक्रीवादळ आले आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. या वादळाच्या तडाख्यात तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे तर एक कोटी लोकांना फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

यास चक्रीवादळाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत नुकसान झाले आहे. त्यातुलनेत नजीकच्या राज्यांमध्ये फार नुकसान नाही. मात्र, काही राज्यात या वादळाचा परिणाम जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नाागिरी, पुणे, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती आणि जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तौक्ते वादळाचा तडाखा बसल्यानंतर आता यास च्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे. या वादळाचा राज्यावर फार परिणाम होणार नाही. मात्र, मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तौक्ते वादळाचा आठ राज्यांना फटका बसला होता. राज्य सरकारे नुकसानग्रस्तांना मदत देत आहेत.

Loading...
Advertisement

या वादळाने बंगाल आणि ओडिशा राज्यात मात्र हाहाकार उडाला आहे. नुकसानीचे आकडे खूप मोठे आहेत. वादळाच्या तडाख्याने विजेचे खांब पडल्याने अनेक गावात वीज पुरवठा नाही, झाडे कोसळली आहेत. पंधरा लाख लोक बेघर झाले आहेत. अनेक ठिकाणी विमानांचे उड्डाणे रद्द केले आहेत. जवळपास एक कोटी लोकांना या वादळाचा फटका बसल्याचा दावा केला जात आहे.ओडिशा आणि पश्चिम बंगाल नंतर आज यास वादळ झारखंड राज्यात पोहोचणार आहे. त्यामुळे या राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडूनही परिस्थितीचा अंदाज घेण्यात येत असून राज्यांना मदत करण्यात येत आहे. या राज्यात मोठे नुकसान झाल्याचे दावे होत आहेत. मात्र, अद्याप किती नुकसान झाले याची आधिकृत माहिती मिळालेली नाही. याआधी मागील वर्षात ‘अम्फान’ या चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना बसला होता. तेव्हा तर कोट्यावधींचे नुकसान झाले होते. त्यानंतर वर्षभरातच पुन्हा या राज्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. करोना आणि नैसर्गिक संकटांमुळे देशास मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply