ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतीची नोंद करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यातील एकूण कृषी क्षेत्राच्या ५९.४९ टक्केच क्षेत्रावरील पीक पाहणीची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे.सर्वात कमी ३८. ७७ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणीच्या नोंदी बोदवड तालुक्यात झाल्या असून शेतकऱ्यांनी नोंद करण्याचा कालावधी आता संपुष्टात आला असला तरी तलाठीस्तरावरील नोंदीचा कालावधीत १५ नोव्हेंबरपर्यंत (November )अजून वाढ करण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/navimumbai/marathi-articles-on-kerala-food-1503007/
१५ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती:ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात आली असून सध्या खरीप हंगामाची पीक पाहणी कार्यवाही सुरू आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदीसाठी अद्ययावत व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात देखील आलेले आहे. खरीप हंगामाची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल अपने करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत (October) मुदत देण्यात आली होती.मात्र उशीराच्या मान्सुनमुळे काही शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंद (registration )पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्तांनी मोबाईल अॅपव्दारे (mobile app)शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा (period)वाढवली आहे. अंतीम मुदतवाढ दिल्यानंतरही जिल्ह्यातील(district) फक्त 59.49 टक्के क्षेत्रावरील ई-पीक पाहणीची नोंद झालेली आहे.
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच
- Brain Foods: 30+ वयोगटातील लोकांनी “या” पदार्थांचे रोज सेवन करा ,वाढेल स्मरणशक्ती
- Food Recipe :संध्याकाळी भूक शमवण्यासाठी हे आरोग्यदायी ‘चवळी चाट’ एकदा करून पहा.
ई-पीक पाहणी प्रलंबित कारण…जिल्ह्यात एकूण पीक पाहणी खातेदार ३ लाख ४५ हजार ३१८ एवढे आहे. एकूण पीक पाहणी क्षेत्र(area) 4 लाख 98 हजार 29.28 हेक्टर एवढे आहे. या परिस्थितीमुळे फळपिक विमा काढण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद असणे बंधनकारक करण्यात आलेले नसून .ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याची परिस्थिती आहे. ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये अद्याप जागरुकता झालेली नाही. त्यातच पीक पाहणी नोंदवण्यासाठीची प्रक्रिया माहिती नसणे,मोबाईल हाताळता न येणे इ कारणास्तव जिल्ह्यातील 40 टक्क्यांवर ई-पीक पाहणी प्रलंबीत आहे.
टक्केवारी :बोदवड ३८.७७, एरंडोल ४४.१४, भडगाव ५१.५३, जळगाव ५२.४३, धरणगाव ५३.३५, भुसावळ ५५.१५, जामनेर ५९.१५, पारोळा ५९.३३, अमळनेर ५९.८२, चाळीसगाव ५९.८४, पाचोरा ६२.५४, मुक्ताईनगर ६४.८७, यावल ६६.४२,चोपडा ७०.९० व रावेर ८१.४९
वल ६६.४२,चोपडा ७०.९० व रावेर ८१.४९