Agriculture News: हरभऱ्याच्या पेरणीची योग्य वेळ पिकाचे उत्पादन वाढवते. (Proper timing of gram sowing increases crop yield) त्यामुळे जाणून घ्या योग्य वेळ आणि पुर्वमशागतीचे महत्व (Importance of pre-cultivation). हरभरा पिकाची मुळे खोलवर जात असल्याने खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ से.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया दयाव्यात. तत्पूर्वी हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत (Manure or compost manure) जमिनीत पसरावे. खरीप हंगामात शेणखत किंवा कंपोस्ट खत दिले असल्यास हरभ-यास पुन्हा वेगळे देण्याची गरज नाही. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन हरभरा लागवडीकरीता स्वच्छ करावी.
Monsoon : देशातील 11 राज्यांत पडणार धो धो पाऊस; IMD दिला मोठा इशारा https://t.co/VrF0V9vxFe
— Krushirang (@krushirang) July 2, 2022
जमिनीतील ओलावा आणि हवेतील तापमान याचा विचार करुन पेरणीची वेळ निश्चित करावी लागते. आपल्याकडे १५ ऑक्टोंबरनंतर सहसा पाउस पडत नसल्याने जिरायत क्षेत्रात हरभ-याची पेरणी खरिपाचे पीक निघाल्याबरोबर शक्यतो सप्टेंबरच्या दुसरा पंधरवाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडया पर्यंतच जिरायत हरभरा पेरणी पुणे करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेबरच्या दरम्यान करावी. म्हणजे हरभरा पिकाचा फुलोरा कालावधी आणि घाटे लागण्याचा कालावधी चांगल्या थंडीमध्ये येतो.
Monsoon: सावधान! मान्सूनने देशभरात घेतली एन्ट्री, हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा https://t.co/rcnYOloXMe
— Krushirang (@krushirang) July 3, 2022
थंडीस पोषक असणारे हे पीक असल्यामुळे डिसेंबर -जानेवारी महिन्यातील थंडी या पिकास चांगली मानवते आणि त्यापासुन चांगले उत्पादन मिळण्यास उपयोग होतो. तसेच बागायत क्षेत्रात ५ से.मी. खोलीवर हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होउन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होउन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी पीक पेरणी वेळेवर होणे महत्वाचे असते.
Agriculture News: हरभरा पिकाचे आहे अनन्यसाधारण महत्व; जाणून घ्या थोडक्यात https://t.co/6WjZIb6r5x
— Krushirang (@krushirang) July 3, 2022
अशी जमीन ठरेल फलदायी (Such land will be fruitful):- हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० से.मी खोल), पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, मुसमुसीत जमिन आवश्यक असते. हलकी, चोपण अथवा पाणथळ,क्षारयुक्त जमिन हरभरा लागवडीसाठी वापरु नये.
पेरणी (Sowing) :- हरभरा पेरणी करताना दोन ळीतील अंतर ३० सेभी. आणि दोन रोपातील अंतर १० से.भी. राहील अशा पध्दतीने पेरणी करावी म्हणजे रोपांची संख्या प्रति हेक्टरी अपेक्षित (३,३३,३३३) राहुन उत्पादन चांगले मिळते. तीन फुट रंदीच्या सर्या पाडून वरंब्याच्या दोनही बाजूस हरभरा टोकण केल्यास सुध्दा अतिशय चांगले हरभरा उत्पादन मिळते. काबुली वाणाकरीता ४५ x १० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हरभरा सरी वरव्यांवरही चांगला येतो. काबुली वाणासाठी जमीन ओलावुन वापशावर पेरणी करावी त्यामुळे उगवण चांगली होते.
Todays Recipe : घरच्या घरीच तयार करा टेस्टी Coconut Barfi; ही आहे एकदम सोपी Recipe.. https://t.co/iH0UVg1IbT
— Krushirang (@krushirang) July 2, 2022
बीजप्रक्रिया (Seed processing) :- बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास प्रथम ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा २ ग्रॅम थायरम 4 २ ग्रॅम कार्बेडेंझीम एकत्र करुन चोळावे. यांनतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅमि रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून (Rhizobium bacterial culture from cold solution of jiggery) चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गुळ घेवून तो विरघळेपर्यत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळात ग्रंथीचे प्रमाण वाढते व हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेवून पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे उत्पादन वाढते.
BJP: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, मात्र नजरा फडणवीसांवर?; ‘मास्टरस्ट्रोक’मागचा संपुर्ण खेळ समजून घ्या https://t.co/2bQsa6azCX
— Krushirang (@krushirang) July 2, 2022