Agriculture News: सोलापूर (Solapur News): भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre Mumbai) यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर / Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur)) दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी राहण्याची शक्यता आहे. पक्व खरीप मूग, उडीद, सोयाबिन, मका, बाजरी आणि सूर्यफूल पिकाची त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. असा सल्ला ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर (AGROMET ADVISORY BULLETIN GRAMIN KRISHI MAUSAM SEWA, DISTRICT AGROMET UNIT, KRISHI VIGYAN KENDRA, MOHOL, SOLAPUR.) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
सोयाबिन (Soybean) (शेंगा भरण्याची ते पक्वता अवस्था) विविध प्रकारच्या किडींच्या/ अळींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये एकरी ८ ते १० पक्षी थांबे उभारावेत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे, नियंत्रणासाठी अंडी समुहांचा तसेच समुहाने आढळणा-या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक किटकनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २० मिली किंवा सायपरमेथ्रिन २५ टक्के ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. आद्रतायुक्त वातावरणामुळे तांबेरा या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोन्याझोल किवा हेक्झाकोन्याझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी करावी.
वेळेवर पेरणी झालेल्या पक्व सोयाबीन पिकाची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. (control of leaf eating spodoptera larva spray erect 5 spodulure pheromone traps per hectare, collect and destroy the egg masses and larva which will help in controlling the pest.)
- IMD Alert: पावसात पिकांची ‘अशी’ घ्या काळजी; क्लिक करून वाचा कृषी सल्ला
- Monsoon : देशातील 11 राज्यांत पडणार धो धो पाऊस; IMD दिला मोठा इशारा
- Agriculture News: कापसावरील गुलाबी बोंडअळीचा असा करा नायनाट; वाचा कृषीसल्ला
मका (Maize), सूर्यफूल (sunflower) आणि बाजरी (Pearl millet / Bajara) यांची वेळेवर पेरणी झालेल्या पक्व मका पिकाची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूर (Pigeon pea) पिकात किडीच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्याकरिता प्रती हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. आवशक्यतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी त्यामुळे जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्यासाठी पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही. रब्बी ज्वारी (Rabi Sorghum) रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कलावधीत जमिनीत पुरेसा ओलावा असताना ५ सेमी खोलीपर्यंत करावी. रब्बी हंगामात ज्वारी पेरणीसाठी सुधारित वाणाचे बियाणे, जिवाणू संवर्धके, खते इत्यादी निविष्ठांचे नियोजन करावे. तसेच रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी शिफारस केलेले सुधारित/ संकरीत वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत. हलक्या जमीनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम जमीनीसाठी फुले सूचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-३५-१ भारी जमीनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२ , पी. के. व्ही. क्रांती, परभणी मोती, संकरीत वाण: सी.एस.एच. १५ आणि सी.एस.एच. १९ बागायती साठी फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही.- १८, सी.एस.एच. १५ आणि सी.एस.एच.१९ हुरड्यासाठी वाण: फुले उत्तरा, फुले मधुर. लाहयासाठी वाण फुले पंचमी पापडासाठी वाण फुले रोहिणी. रब्बी ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरूरी चे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५ x १५ सेमी. अंतरावर करावी. पेरणी पूर्वी प्रती किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे ) चोळावे.तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावे. जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
रब्बी करडईची (Rabi safflower) पेरणी सप्टेंबरचा दूसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमिनीत पुरेसा ओलावा असताना करावी. रब्बी हंगामात करडई पेरणीसाठी बियाणे, जिवाणू संवर्धके, खते इत्यादी निविष्ठांचे नियोजन करावे. तसेच करडईच्या पेरणीसाठी शिफारस केलेले सरळ/ संकरीत वाणांची निवड करावी. करडईच्या कोरडवाहु क्षेत्रात पेरणीसाठी भीमा, फुले कुसुमा, फुले करडई – ७३३ या सरळ वाणांची निवड करावी. कोरडवाहु तसेच बागायती लागवडी साठी एस. एस. एफ.-७०८, फुले चंद्रभागा (एस. एस. एफ. ७४८), एस. एस. एफ.१२-४० या सरळ वाणांची निवड करावी. तर नारी एन.एच. -१ या संकरीत वाणाची निवड करावी. कोरडवाहू हरभरा (Chick Pea) पेरणीसाठी शेत तयार करून घेऊन पेरणी २५ सप्टेंबर नंतर जमितील ओल कमी होण्यापूर्वी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावे. बिजप्रक्रिया करणे फार आवश्यक असून यासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डीझीयम प्रती किलो बियाण्यास चोळावे जेणेकरून संभाव्य बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळेल.