Agriculture News: सोलापूर (Solapur News): भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre Mumbai) यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ०१, ०२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दिनांक ०३ ते ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर / Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur)) दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी राहण्याची शक्यता आहे.
- पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेले पिके शेड मध्ये किंवा प्लास्टीकच्या कागदाने झाकून ठेवावीत.
- शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे किड व रोगसंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुसकान पातळीच्या वर आसल्यास योग्य उपाययोजना कराव्यात.
- हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.
- मेघ गर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी बांबू च्या सहय्याने आधार द्यावा.
- शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे . झाडाखाली .थांबणे टाळावे जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी न्यावीत.
- जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत.वाहने झाडाखाली उभी करू नयेत. विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळा. जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये.