Agriculture news: अहमदनगर (Ahmednagar): राज्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात व आनंदात पार पडल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले ते दसरा (Dussehra) व दिवाळीचे (Diwali). काही दिवसांवर नवरात्र आणि दसरा हा सण समस्त देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. अगदी देवीच्या घटांची स्थापना झाल्यापासून ते शेवटच्या विजयादशमीच्या दिवसापर्यंत लोकांमध्ये मोठा उत्साह व (happiness) भक्तिभाव (devotion) पाहायला मिळेल. या दिवसात अनेक लोक विविध गोष्टींची खरेदीही करतील. हा सण अनेकांसाठी हर्षोल्हास घेऊन येत असतानाही अनेकांना याचा हर्षोल्हास लाभत नाही. तो घटक आहे शेतकरी (Flower cultivation of farmers). होय, नव्या जमान्यात शेतकऱ्यांना उन्नतीची एक संधी हिरावली गेली आहे. ते म्हणजे फुलांची अधिकची विक्री न होत असल्याने चिंतेत असलेला शेतकरीवर्ग. याला कारण आहे कृत्रिम फुलांची आयात.
- Agriculture News : जोरदार पावसामध्ये अशी घ्या जनावरे-पिकांची काळजी; लम्पी रोगाबाबत सल्लाही वाचा की
- Agriculture news: ‘त्या’ साध्या ट्रिकने उत्पन्नात 15 टक्यांनी वाढ; वाचा तूर पिकावरील महत्वाचा सल्ला
- Agriculture In Space : चीनची कमालच..! अवकाशात केली ‘या’ पिकांची शेती; पहा, आता पुढे काय होणार ?
दसरा सणात मोठ्या प्रमाणात देवींची आरास केली जाते. देवीचे पूजन, पूजापाठ केली जाते. या काळात मोठ्या प्रमाणात शेवंती (Chrysanthemum), झेंडू (marigold) व अन्य फुलांची मागणी असते. मात्र, प्रत्येकाला ही हवीहवीशी वाटणारी, टवटवीत आणि मन प्रसन्न करणारी ही घेण्याकडे लोकांचा कल आजकाल कमी होताना दिसतो आहे. याला कारणीभूत ठरली आहेत ती चायना (China) मधून भारतात निर्यात होत असणारी शेवंती, झेंडूची कृत्रिम फुले. या प्रकारामुळे फुलांची शेती करणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. याच कारणास्तव शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन अहमदनगरमधील हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी शासनाला या कृत्रिम फुलांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच व्यापारी आणि आयतदार यांनाही त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून चीनमधून आयात केलेली कृत्रिम (Artificial flowers) प्लॅस्टिकची फुले मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झालेली आहेत. ही फुले पर्यावरण पूरक (Environmentally friendly) नसली तरी ही फुले फार काळ टिकत असल्याने ग्राहक वर्ग या फुलांकडे वळलेला दिसतो आहे. यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली असून याचा परिणाम शेतकरी वर्गावर होताना दिसून येत आहे. जर दसरा, दिवाळीच्या आधी या फुलांवर शासनाने बंदी आणली नाही तर, नगर जिल्ह्यातील अशी सर्व कृत्रिम फुले विकणाऱ्या विक्रेत्यांना फुले विकू देणार नाही व या दुकानांमधील फुले गोळा करून त्याची होळी करून या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी प्रशासन यासाठी जबाबदार असेल.
अशा आशयाचे निवेदन पत्र नगरचे उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांना हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे (Deputy Collector Smt. Pallavi Nirmal was visited by District President of Hindu Rashtra Sena Sanjay Adole) यांनी दिले आहे. त्यात ते म्हणाले की, मोठ्या कष्टाने पिकवलेल्या फुलांच्या शेतीतून अर्थार्जन होईल या आशेपोटी बसलेला शेतकरी यामुळे हवालदिल झालेला आहे. नैसर्गिक फुले घेण्याकडे लोकांचा कमी झालेला कल पाहता शेतकऱ्यांची यातून उपासमार होऊ नये यासाठी चायना निर्मित कृत्रिम फुले न घेता नैसर्गिक निर्मित फुलेच नागरिकांनी घ्यावीत. निवेदन देतेवेळी संघटनेचे निखिल धंगेकर, रुद्रेश अंबाडे, ॲड. अभिजीत पुप्पाल,विठ्ठल बारस्कर, लोकेश साळुंके, समर्थ गोसावी, आकाश वाबळे, अक्षय दिवटे, केतन बडवे, सचिन निक्रड, सागर जाधव,दिपक माळी, संतोष चेन्नूर, वरूण गुरव आदी उपस्थित होते. (Nikhil Dhangekar, Rudresh Ambade, Adv. Abhijit Puppal, Vitthal Barskar, Lokesh Salunke, Samarth Gosavi, Akash Wable, Akshay Divte, Ketan Badve, Sachin Nikrad, Sagar Jadhav, Deepak Mali, Santosh Chennur, Varun Gurav)