Agriculture News : सोलापूर : ग्रामीण कृषि मौसम सेवा (जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर / Grameen Krishi Mausam Seva, District Krishi Vigyan Kendra, Krishi Vigyan Kendra, Mohol, Solapur) यांनी हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीची साप्ताहिक बैठक झाल्यानंतर याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार (weather forecast) मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे,  नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)  दिनांक ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे.

जनावरांचे व्यवस्थापन लम्पी त्वचा रोग कारणे

लम्पी त्वचा रोग या रोगाचा संसर्ग “कॅप्रीपॉक्स” ( Capri pox) विषाणू मुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे.

कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे.

रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई

करणे.

डास, गोचिड व तत्सम किड्यांच्या बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.

रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास

प्रतिबंधक करणे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना

तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत.

त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर पशुवैद्यकाच्या

मार्गदर्शनानुसार औषध मलम लावावे.

लम्पी या त्वचा रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करून घ्यावे.

 

Regional Meteorological Center, Mumbai of Indian Meteorological Department, the rainfall in Madhya Maharashtra Division (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur))

संदेश पावसाची शक्यता असल्याने पक्व खरीप मूग, उडीद पिकाची त्वरित काढणी करावी. व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
मूग काढणी पावसाची शक्यता असल्याने पक्व खरीप मूग पिकाची त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मुगाच्या शेंगया ७५ % वाळवल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.

पाऊस झाल्यानंतर मूग पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

उडीद काढणी पावसाची शक्यता असल्याने पक्व खरीप उडीद पिकाची त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उडीद पिकाच्या च्या शेंगा ७० % शेंगा परिपक्व झाल्यानंतर व पावसाची उघडीप  मिळाल्यानंतर लगेच काढणी करावी.  काढणी एक किंवा दोन टप्प्यांमध्ये करावी जेणेकरून दाणेगळ होणार नाही.
तूर फांद्या फुटण्याची अवस्था Ø  पिक ४५ दिवसांचे झाल्यावर झाडाचा एकदाच वरून ५ सें.मी. शेंडा खुडावा.

Ø  पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५% निंबोळी अर्काची किंवा अझाडीरेक्टीन १५०० पीपीएमची

Ø  ५ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

Ø  शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पिकात हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत तसेच हेक्टरी ५०-६० पक्षी थांबे उभारावेत.

Ø  वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

Ø  रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सल्फर ८० डबल्यु पी २.५ ग्राम / लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

ऊस वाढीची अवस्था सहा ते आठ आठवडे वयाच्या आडसाली लागणीस को-८६०३२, जातीसाठी शिफारशीत (५००:२००:२०० किलो नत्र, स्फुरद व पालश) खत मात्रेच्या ४० % नत्र खताची दुसरी मात्रा घ्यावी. यासाठी २०० किलो नत्र (४३४ किलो युरिया) व इतर जातीसाठी  शिफारशीत (४००:१७०:१७० किलो नत्र, स्फुरद व पालश) खत मात्रेच्या ४० % नत्र खताची दुसरी मात्रा घ्यावी. यासाठी १६० किलो नत्र (३४७ किलो युरिया) प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावे. खत मात्रा देताना ६ किलो युरिया साथी १ किलो निंबोळी पेंडीची भुकटी चोळून द्यावी.
सोयाबीन फांद्या फुटण्याची ते फुले लागण्याची  अवस्था सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पिकावरील पाने खाणारी अळीने  (स्पोडोप्टेरा) आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असल्यास एस.एल.एन.पी.व्ही. ही ५०० एल ई अथवा डायफलोव्हास ७६% ई सी अथवा एन्डोक्झार्काब १५.८% ई सी ६.६ मिली १० लीटर पाण्यातून स्वच्छ व निरभ्र वातावरणात  फवारा. नोमूरिआ रिलेई बुरशीच्या वापराने ही अळ्या रोगग्रस्त होऊन मरतात.
मका तुरा बाहेर पडताना व फुलोर्‍यात असताना अवस्था पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० % पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची एकदा स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी घ्यावी.

क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी.

किंवा स्पीनोटोराम ११.७ % एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी.

किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ % एस जी ०.४% ग्राम प्रती लीटर पाणी.

कांदा   रोपाच्या लागवडीनंतर ४५ दिवसानी तण असल्यास हलकी खुरपणी करावी आणि त्याच वेळेस ५० किलो

उर्वरीत नत्राची मात्रा द्यावी.

कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फूलकिडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यासाठी लॅंब्डासायहॅलोथ्रिन ६ मिली + टेब्यूकोनाझोल १० मिली +स्टीकर १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी करावी.

काकडी,

कारली, दोडका,

घोसाळी,

दुधी भोपळा,

तांबडा भोपळा

  वेलवर्गीय भाजीपाला

केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून

बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसाच्या अंतराने क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर

ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात साध्या हात पंपाने फवारणी करावी. रोगाची

तीव्रता वाढल्यास मेटॅलॅक्झिल एम.झेड-७२ हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात दर

दहा दिवसांच्या अंतराने फवारावे.

भुरी रोगाची व दिसताच ट्रायडेमॉर्फ किंवा पॅन्कोनाझोल १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून मिसळून

साध्या हात पंपाने आलटून-पालटून आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.

फळ माशीच्या नियंत्रणासाठी क्यु-ल्युर कामगंधे सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version