Agriculture News: हरभरा (Gram) हे पीक थंड हवामानास प्रतिसाद देणारे पीक आहे. तथापि ढगाळ हवामान असल्यास थंडीचे प्रमाण फारच कमी होते. हे वातावरण पिकास मानवत नाही आणि पिकास फांद्या, दुय्यम फांदया प्रमाणात फुले लागणे तसेच घाटयामध्ये दाणे भरण्यावर सुध्दा विपरीत परिणाम दिसुन येतो. एकुणच पिकाची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट याव्यतिरिक्त ढगाळ हवामानामुळे घाटे अळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र अशातही काबुली हरभरा करावा की देशी हरभरा करावा? हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
Maharashtra politics: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे आमनेसामने; जाणुन घ्या आकड्यांचा खेळ https://t.co/eGHdomgpKe
— Krushirang (@krushirang) July 3, 2022
देशी हरभ-यापासुन उदा. विजय, विशाल, दिग्विजय (Vijay, Vishal, Digvijay) या वाणांपासुन अनेक शेतकरी बाधव १२ ते१४ किं./एकर असे उत्पादन घेतात. सध्यस्थितीमध्ये साधारणपणे तीन हजार रुपये प्रति क्विटल बाजारभाव देशी वाणास मिळतो, म्हणजेच ३६०००/- रु प्रति एकर एवढे उत्पन्न मिळ शकते. अशाच प्रकारे मध्यम काबुली वाणांकरीता बाजारभाव मिळतो तथापि काबुली हरभऱ्यामध्ये उत्पादन देशी वाणापेक्षा कमी मिळते. अलिकडे कृषि विद्यापीठाने (University of Agriculture) जास्त टपोऱ्या दाण्यांचे वाण काबुली हरभऱ्यामध्ये प्रसारित केले आहेत. त्यास अतिशय आकर्षक असा बाजारभाव मिळतो.
Monsoon: सावधान! मान्सूनने देशभरात घेतली एन्ट्री, हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा https://t.co/rcnYOloXMe
— Krushirang (@krushirang) July 3, 2022
या जास्त टपोऱ्या दाणे असलेल्या वाणांचे उत्पादन कमी जरी असले तरी त्यास भाव चांगला मिळाल्यामुळे त्याचे एकुण उत्पादन आणि नफा सर्वाधिक मिळतो. मात्र काबुली हरभरा लागवड करतांनी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा उगवण अतिशय कमी होऊन उत्पादनात मोठी घट येते. जास्त टपोऱ्या काबुली हरभऱ्याची लागवड योग्य पध्दतीने केल्यास त्यापासुन मिळणारे उत्पादन आणि नफा नेहमीच देशी हरमन्यापेक्षा अधिक असतो. (Gram is a crop that responds to cold weather. However, if the weather is cloudy, the cold is very low. This environment does not humanize the crop and adversely affects the flowering of the crop, secondary branching and seed filling in the valley. Overall crop growth slows down and yields decline. In addition, cloudy weather increases the incidence of larvae. But should we still accept Kabuli Harbhara or Deshi Harbhara? This question falls on everyone.) हरभरा पिकाचे उदा. चाफा, एन-५९, एन ३१, विकास, विश्वास, फुले जी-१२, हिरवा चाफा, बी.डी.एन.९-३ इ. वाण लागवडीकरीता प्रसारीत झालेले आहेत. तथापि खालील तक्त्यात दर्शविलेले अधिक उत्पादनशील आणि रोग प्रतिकारक्षम वाणाचीच लागवडीसाठी निवड करणे योग्य ठरते.
Agriculture News: हरभरा पिकाचे आहे अनन्यसाधारण महत्व; जाणून घ्या थोडक्यात https://t.co/6WjZIb6r5x
— Krushirang (@krushirang) July 3, 2022
सुधारित वाण | कालावधी (दिवस) | उत्पादन | वैशिस्टे |
विजय | जी.८५-९०
बा. : १०५-११० |
जिरायत : १४-१५ क्वि.\हे
बागायत : ३५-४० क्विं.\हे उशिरा पेर : १६-१७ क्विं.\हे
|
अधिक उत्पादन क्षमता, मररोग, प्रतिकारक,
जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस, योग्य, आवर्षन प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारित |
विशाल | ११०-११५ | जिरायत : १४-१५ क्विं.\हे
बागायत : ३०-३५ क्विं.\हे |
आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक
उत्पादनक्षम, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित |
दिग्विजय | जी : ९०-९५
बा : १०५-११० |
जिरायत : १४-१५ क्विं.\हे
बागायत : ३५-४० क्विं.\हे उशिरा पेर : १८-२० क्विं.\हे |
पिवळसर तांबूस, टपोरे दाणे मर रोग
प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित |
विराट | ११०-११५ | जिरायत : १०-१२ क्विं.\हे
बागायत : ३०-३२ क्विं.\हे |
काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित |
कृपा | १०५-११० | सरसरी उत्पादन
बागायत : १६-१८ क्विं.\हे उत्पादन क्षमता : ३०-३२ क्वि.\हे |
जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित. |
पी.के.व्ही. के.-२ | ११०-११५ | बागायत : २६-२८ क्विं.\हे | अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्र राज्यांकरिता प्रसारित |
पी,के.व्ही.के.-४ | १००-११० | सरसरी उत्पादन बागायत : १६१८ | जास्त टपोरे दाणे, काबुली वाण, आकर्षक बाजारभाव, अधिक उत्पादन, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित |
बिडीएन जी – ७९७ | १०५-११० | जिरायत : १४-१५ क्विं.\हे
बागायत : २०-२२ क्विं.\हे |
मध्यम आकाराचे दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित |
Monsoon season Tourism in Sahyadri: भीमाशंकर अभयारण्यात आहे समृद्ध वन्यजीवन; क्लिक करून वाचा माहिती https://t.co/jN71fhy2uT
— Krushirang (@krushirang) July 2, 2022