Agriculture Input Scam । खत म्हणून विकली माती; कोट्यावधींची झाली फसवणूक

Agriculture Input Scam । राज्यात यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या करायला देखील सुरुवात केली आहे. शेतकरी पिकांच्या वाढीसाठी खतांचा वापर करतात. पण सध्या बाजारात नकली खते विकली जात आहेत.

अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रामा फर्टिकेम या कंपनीकडून अनेक जिल्ह्यांत विक्री करण्यात आलेल्या रासायनिक खतांचा नमुने अहवाल अप्रमाणित आला आहे. खताच्या नावावर या कंपनीने चक्क माती विकून शेतकऱ्यांना करोडोंचा चुना लावला आहे. २०२२ पासून खत उत्पादनांसाठी कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या या कंपनीद्वारे कोणत्या जिल्ह्यांत किती टन खतांची विक्री केली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे याची कुठलीच माहिती कृषी विभागाकडेही उपलब्ध नाही.

संबंधित कंपनीचे अमरावती जिल्ह्यात डीएपी आणि एनपीके या खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने कंपनीविरोधात एफआयआर नोंद करून त्यानंतर यवतमाळमधील अनेक तालुक्यांत खतांची विक्री झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक झाली आहे. आर्वी येथेही याच कंपनीच्या बोगस खतांचा साठा जप्त केला असून नांदेड जिल्ह्यातही संबंधित कंपनीच्या बोगस खतांची विक्री झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

संबंधित कंपनीद्वारा विक्री केलेली रासायनिक खते ही केंद्र सरकारच्या अनुदानाच्या श्रेणीमध्ये येत आहेत. या खतांची आयएफएमएस प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक होते. पण कंपनीद्वारा तसे केले नाही. केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाने खतांची विक्री केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कंपनीकडील आयसी प्रमाणपत्राची सद्य:स्थितीदेखील डिसॲक्टिव्ह आहे.

Leave a Comment