सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये (Solapur District rain update) दिनांक ०४ आणि ०५ मे २०२२ रोजी काही ठिकाणी तुरळक हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी स्व:ताची, पिकाची (crop care) व आपल्या पशुधंनाची काळजी (animal health care in rainy season marathi mahiti / information) घ्यावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र (मोहोळ, सोलापूर) (KVK Mohol) यांच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पाच्या जिल्हा कृषि हवामान केंद्र यांनी केले आहे.

 

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई (weather update from imd Mumbai) यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पक्व झालेल्या फळ (fruits) व भाजीपाला (vegetables) पिकांची त्वरित काढणी करावी व पावसाची शक्यता असल्याने काढलेली फळे व भाजीपाला सुरक्षित ठिकाणी ठेवावा. किटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी पाऊस नसताना व वारा शांत असतानाच करावी. काढणी केलेला शेती माल प्लास्टिकच्या शीटणे झाकावा. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात. हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत (meghadoot) या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा (damini mobile app) वापर करावा.

सुरू उस लागवडीस (sugarcane cultivation tips)  १२ ते १६ आठवडे झाले असल्यास रासायनिक खतांचा तिसरा हप्ता नत्र @ २५ किलो प्रती हेक्टरी (युरिया ५४ किलो प्रती हेक्टर) या प्रमाणात द्यावा. उसावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ५ गंध सापळे (ई.एस.बी.ल्युर) प्रती हेक्टर या प्रमाणात लावावेत. ऊस पीक हे तण विरहित ठेवावे. मे महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग ९.२४ प्रति दिवस एवढा असतो ऊस पिकास दररोज ९.३३ लिटर पाण्याची आवश्‍यकता असते त्यासाठी ठिबक सिंचन संच (४ लिटरचा ड्रीपर) दररोज २ तास २० मिनिटे चालवावा. द्राक्ष (grapes farming tips) फळबागेमध्ये एप्रिल/ खरड छाटणी करून घ्यावी. द्राक्षवेलीच्या काडीवरील डोळ्यामध्ये सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी एप्रिल किंवा खरड छाटणी महत्वाची असते. खरड छाटणी वेळेवर करून छाटलेल्या काड्या व पाने बांधावर न टाकता दूरवर जाळून नष्ट कराव्यात.

भुईमुग (groundnuts) पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीच्या मगदूराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. भुईमुग पिकास शेंगा पोसण्याच्या अवस्थेत (६५ ते ७० दिवस) पाण्याचा ताण पडू देऊ नये. या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. उन्हाळी कांदा (Unhali Kanda / Onion) पिक पक्व झालेले असल्यास त्वरित काढणी करावी. व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. केळी लागवडीस (Banana farming tips) १६५ दिवस पूर्ण झाले असल्यास रासायनिक खतांची मात्रा युरिया @ ८२ ग्रॅम प्रती झाड आणि म्युरेट ऑफ पॉटॅश ८३ ग्रॅम प्रती झाड याप्रमाणे द्यावे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने झाडे पडू नयेत म्हणून व वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्र्माणे बांबूचे किंवा पॉलीप्रोपेलीनच्या पाट्यांच्या सहयाने झाडांना / घडाना आधार/ टेकू द्यावा. डाळिंब (Damilb / Pomegranate farming) बागेत पावसानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट ५ % एस जी २ ग्रॅम प्रती लिटर प्रोपीकोनाझोल २५ % इसी २ मिली प्रती लिटर पाणी यांची एकत्रित ड्रेंचिंग केल्याने खोड किडा व मर रोगाची बुरशी यांचा प्रादुर्भाव व झाडावरील सच्छिद्रता कमी करता येते.

Share.

Leave A Reply

Exit mobile version