Agriculture Education MPKV News: अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यामध्ये मुंबई येथे सामंजस्य करार (Mahatma Phule Agricultural University in Rahuri and Murdoch University in Australia in Mumbai) करण्यात आला आहे. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, ऑस्ट्रेलियाचे संस्कृती, कला व आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाचे मंत्री डेव्हिड टेम्पलमन (Chancellor Dr. P.G. Patil, Australia’s Minister of Culture, Arts and International Education David Templeman) उपस्थित होते. यावेळी झालेल्या सामंजस्य करारावर संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व आंतरराष्ट्रीय मरडॉक विद्यापीठाचे कुलपती केली स्मिथ (Director of Research and Extension Education Dr. Signed by Sharad Gadakh and Kelly Smith, Chancellor of the International Murdoch University) यांनी सह्या केल्या.
Adani Vs Ambani: अंबानींना आता अदानी झटका; दोन गुजरातींमध्ये त्यावर पेटणार बिजनेस वॉर https://t.co/fUloTteqWP
— Krushirang (@krushirang) July 15, 2022
याप्रसंगी मरडॉक विद्यापीठाचे संचालक डॉ. राजीव वार्ष्णेय, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासळकर व कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते. ऑस्ट्रेलियन चमूचे नेतृत्व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रांताचे उपमुख्यमंत्री व पर्यटन, व्यापार आणि विज्ञान मंत्री श्री. रॉजर कुक यांनी केले. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषि शिक्षण व संशोधनाची देवाण-घेवाण होणार आहे. यामध्ये दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना एकमेकांच्या विद्यापीठांतर्गत अभ्यास करता येईल. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यावेळी म्हणाले की या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून कृषि क्षेत्रामधील नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. डॉ. राजीव वार्ष्णेय यांनी सांगितले की या करारामुळे मरडॉक विद्यापीठाला महात्मा फुले कृषि विद्यापीठाबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. श्री. डेव्हिड टेम्पलमन यांनीही या सामंजस्य करारावर समाधान व्यक्त केले. (Dr. Rajiv Varshney, Dean Dr. Dr. Pramod Rasal, Associate Dean of Pune Agricultural College Sunil Masalkar and Vice Chancellor’s Technical Officer Dr. Pawan Kulwal)
Onion Price : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. ‘येथे’ कांद्याला मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या.. https://t.co/XsjUKYY2wv
— Krushirang (@krushirang) July 15, 2022