Agriculture Department Scam प्रकरणी किसान संघ आक्रमक; खाल्ले शेतकऱ्यांचे तब्बल 119 कोटी..!

Agriculture Department Scam । राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विविध पिकांच्या माध्यमातून शेतकरी प्रगती करत आहेत. अनेकदा शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. अशातच आता कृषी विभागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

राज्याच्या कृषी विभागात तब्बल 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाकडून करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाकडून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटलडिहाईड (कीटकनाशक) आणि नॅनो युरिया या चार वस्तू कंत्राटदारांकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यासाठी बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन ह्या वस्तू खरेदी करत कंत्राटदारांची खिसे भरले आहेत, आता त्या दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा गंभीर आरोप ही भारतीय किसान संघाचे नेते नाना आखरे यांनी केला आहे.

जाणून घ्या घोटाळा

कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाकडून शेतकऱ्यांना डीबीटी च्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटलडिहाईड आणि नॅनो युरिया या चार वस्तू कंत्राटदारांकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला होता. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी बाजार भावाच्या दुप्पट ते सहा पट दर देऊन सरकारचे आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान केले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बाजारात 300 ते 400 रुपयाना मिळणारी कापूस साठवणूक बॅग 1250 रुपये प्रति बॅग दराने खरेदी करण्यात आली. जास्त दरामुळे सरकारला 52.53 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर तब्बल 2.5 लाख शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.

बॅटरी फवारणी पंप बाजारात 2,190 रुपयात उपलब्ध असताना कृषी विभागाने त्यासाठी प्रति पंप 3,426 मोजले. तर जास्त दरामुळे सरकारचे 26 कोटी रुपयांचे नुकसान झाले, यामुळे 3 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले. मेटलडीहाईट कीटकनाशक बाजारात 225 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असताना कृषी विभागाने 1,275 रुपये प्रति किलोने ते खरेदी केले. म्हणजे सहा पट जास्त दरामुळे सरकारचे 20.71 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

परिणामी 1 लाख 85 हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले असून नॅनो युरियाची बॉटल बाजारात 190 रुपये दराने उपलब्ध असताना कृषी विभागाने ते 220 रुपये प्रति बॉटल या दराने खरेदी केले आहे. जास्त दरामुळे सरकारचे 19.62 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्यामुळे 5 लाख 60 हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले.

Leave a Comment