Agriculture Business Idea : सोप्यात सोपे शेती व्यवसाय, कमी खर्च अन् नफा जास्त; ‘या’ 7 बिजनेसची माहिती घ्याच !

Agriculture Business Idea : सध्याचा आधुनिक काळात शेतीत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. यामुळे शेती करणे (Agriculture Business Idea) सुलभ झाले आहे. आज शेतीच्या आधारावर अनेक व्यवसाय उभे राहिले आहेत. आणि अनेक नव्या व्यवसायाची या क्षेत्रात भर पडत चालली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सुद्धा शेतीशी निगडित काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बिजनेस आयडिया सांगणार आहोत यावर तुम्ही नक्कीच विचार करू शकता. शेतीशी निगडित व्यवसाय तुम्ही कमी बजेटमध्ये सुद्धा सुरू करू शकता. आता असे कोणते व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी सहज करू शकता याची माहिती घेऊया..

सुकलेल्या फुलांचा बिजनेस

आजच्या कृषी क्षेत्रात फुलांचे उत्पादन अतिशय वेगाने वाढत आहे. बाजारात विविध प्रकारच्या (Dry Flower Business) फुलांची मागणी नेहमीच असते. सण उत्सवाच्या प्रसंगी तर फुलांची मागणी विशेष वाढलेली असते. अशा वेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय कसा करायचा याची माहिती घेऊन तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता.

Best Business Tricks शिका मराठीत; कृषी, फार्मसी व इंजिनियरिंगवाल्यांसाठी सुवर्णसंधी

Agriculture Business Idea

फर्टीलायझर डिस्ट्रिब्युशन बिजनेस

तुम्ही तुमच्या गावात हा व्यवसाय कमी खर्चात (Fertilizer Distribution Business) सुरू करू शकता. हा व्यवसाय सरकारद्वारे नियंत्रित आहे. यासाठी तुम्हाला थोड्या पैशांची गरज लागेल. या बिजनेसच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला हजारो रुपयांची कमाई करू शकता.

ऑरगॅनिक फार्म ग्रीन हाऊस

विकसित केलेल्या कृषी उत्पादनाची मागणी गेल्या काही वर्षांत मोठ्या (Organic Farm Green House) प्रमाणात वाढली आहे. यामुळे कृषी क्षेत्राचा विकास वेगाने झाला आहे. रसायने आणि फर्टीलायझरच्या माध्यमातून शेती केली जाते. परंतु यामुळे मानवी आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रसायने युक्त शेती उत्पादने टाळून आता जैविक शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने शेती करून चांगली कमाई करू शकता.

कुक्कुटपालन व्यवसाय

पोल्ट्री फार्मिंग ज्याला कुक्कुटपालन देखील (Poultry Farming) म्हंटले जाते. हा एक असा व्यवसाय आहे ज्यात काळानुरूप नेहमीच बदल होत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा यात उपयोग केला जातो. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. सध्याच्या कृषी क्षेत्रात वेगाने वाढणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

Agriculture Business Idea

Business Idea on Rooftop : तुमच्या घराचं छतही देईल बक्कळ पैसा; ‘या’ 3 पैकी कोणताही बिजनेस सुरू करा

मशरूम शेती

मशरूम शेतीचे प्रचलन सध्या वाढू लागले आहे. या शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. अनेक शेतकरी या नव्या शेतीकडे वळले आहेत. या व्यवसायाच्या स्टार्ट अप साठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. मशरूम शेती कशी करावी याची माहिती घेऊन तुम्ही या पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकता.

हायड्रोपोनिक रिटेल स्टोअर बिजनेस

हायड्रोपोनिकला वृक्षारोपणाचे नवीन तंत्रज्ञान म्हणून (Hydroponic Retail Store Business) संबोधले जाते. हायड्रोपोनिक रिटेल स्टोअरला वाणिज्यिक आणि घरगुती दोन्हींसाठी उपयोगात आणता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने माती मुक्त वृक्षारोपण करता येऊ शकते.

Agriculture Business Idea

सूर्यफूल शेती

सूर्यफूल शेती चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. यासाठी तुमच्याकडे (Sunflower Farming) स्वतःची शेत जमीन असायला हवी. सूर्यफुलाला कमर्शियल कॅश क्रॉप देखील म्हंटले जाते. सूर्यफूल शेतीचा व्यवसाय सध्या वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे या शेतीबाबत आधिक माहिती घेऊन तुम्ही सुद्धा हा बिजनेस सुरू करू शकता.

Leave a Comment