Agneeveer scheme । Agneeveer scheme होणार बंद; त्यासाठी करावे लागणार “हे”, काँगेसची मोठी घोषणा

Agneeveer scheme । राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत.अशातच काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पुन्हा सत्तेत आले तर अग्निपथ योजना बंद केली जाईल, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे.

राहुल गांधी,प्रियंका गांधी वाड्रा आणि सचिन पायलट यांनी अग्निवीरविरोधात पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली असून या योजनेमुळे बाधित तरुणांच्या संघर्षात पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. या अभियानात पक्षासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीडित तरुणांना पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले.

या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करत काँग्रेसने म्हटले की, ‘जय जवान – अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई. जुन्या भरतीतून निवडण्यात आलेल्या तब्बल १.५ लाख उमेदवारांनी ताबडतोब सहभागी व्हावे. अग्निपथ योजना तातडीने बंद करून लष्करातील जुनी कायमस्वरूपी भरती पूर्ववत करावी. न्यायाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी सैनिकांनी यावर नोंदणी करावी किंवा 9999812024 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा, असे आवाहन सध्या करण्यात येत आहे.

सरकारकडून प्रसिद्धीवर करोडो रुपये खर्च : सचिन पायलट

सचिन पायलट म्हणाले की, ‘देशात सुमारे 2 लाख तरुण आहेत ज्यांची निवड झाली पण त्यांना जॉईनिंग दिले नाही. G-20 सारखे कार्यक्रम, पंतप्रधानांचे विमान, सेंट्रल व्हिस्टासारखे प्रकल्प आणि त्यांची प्रसिद्धी यावर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. पण केवळ पैसा वाचवण्यासाठी लष्कराच्या भरती प्रक्रियेशी खेळणे देशाच्या सुरक्षेला आव्हान ठरेल. ज्या तरुणांची निवड झाली त्यांना नोकऱ्या द्याव्यात, ही आमची विनंती असून काँग्रेस पक्ष देशातील सर्व तरुणांच्या पाठीशी उभा आहे ज्यांना सैन्यात आपले भविष्य दिसते.

लाखो होतकरू तरुणांच्या स्वप्नांचा केला चुराडा: प्रियांका गांधी

प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, ‘देशभरातील लाखो तरुण आपल्या मनात देशभक्ती आणि सेवेची भावना ठेवून अहोरात्र मेहनत करत असून थंडी असो, ऊन असो वा पाऊस, सकाळी लवकर उठून ते धावण्याचा सराव करतात. सैन्यात भरती होईल, देशसेवा होईल आणि रोजगारही मिळेल, असे त्यांना वाटते. पण भाजप सरकारने अग्निवीर योजना आणून देशातील लाखो होतकरू तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. लाखो पदे रिक्त, करोडो तरुण बेरोजगार – ही मोदींची हमी आहे.

Leave a Comment