Agneepath Recruitment: अग्निपथ योजना 2022 (Agneepath Recruitment 2022) अंतर्गत अग्निपथ वायु पदांच्या भरतीसाठी भारतीय हवाई दल (Indian Air force) आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू करेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर 5 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अधिसूचना भारतीय हवाई दलाने अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in वर 20 जून 2022 रोजी प्रसिद्ध केली.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार COBSE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
वय श्रेणी
अर्जदाराची जन्मतारीख 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान असावी.
परीक्षा शुल्क
उमेदवाराला 250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्जदारांची ऑनलाइन परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि पेपर इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल.
इंडीयन आर्मी अग्निपथ भारती 2022: अर्ज कसा करायचा
1. सर्वप्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in ला भेट देतात.
2. होम पेजवर दिलेल्या अग्निपथ टॅबवर जा आणि त्यानंतर संबंधित ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
3. स्वतःची नोंदणी करा आणि तपशील प्रविष्ट करा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज फी भरा आणि सबमिट करा
या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 24 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जुलै 2022