दिल्ली – मध्य प्रदेश (MP) आणि दिल्लीनंतर (Delhi) आता गुजरातमध्येही (Gujarat) बुलडोझरची (Bulldozer) भीती दिसली. गुजरातच्या हिम्मतनगर शहरात, पालिकेने एका भागात “अतिक्रमण विरोधी” कारवाईचा भाग म्हणून झोपड्या, किऑस्क आणि दुकानाच्या इमारतीचा एक भाग पाडला. या महिन्यात येथे रामनवमी मिरवणुकीत जातीय संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरचे मुख्य नगरपालिका अधिकारी नवनीत पटेल म्हणाले, “आजच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत आम्ही छपरियातील टीपी रोडवरील 3-4 किऑस्क, 2-3 झोपड्या आणि एक दोन मजली दुकानाची इमारत हटवली.”
पुढे ते म्हणाले, “पंधरा मीटर रस्त्याच्या सुमारे तीन मीटर जागेवर जमीनदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी बेकायदा बांधकाम पुढे केले होते. आम्ही 2020 मध्ये नोटीस पाठवली. ही एक नियमित अतिक्रमण विरोधी मोहीम होती आणि 10 एप्रिलच्या घटनांशी त्याचा काहीही संबंध नाही. आम्ही इतर क्षेत्रातही अशाच कारवाई करत राहू.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी परिसरात झालेल्या जातीय संघर्षामुळे ज्या मालमत्तांची नासधूस करण्यात आली, त्यांचा कोणत्याही आरोपीशी संबंध नव्हता. साबरकांठा एसपी विशाल वाघेला म्हणाले, “मंगळवारी, नागरी संस्थेने आम्हाला अतिक्रमणविरोधी मोहिमेची माहिती दिल्यानंतर पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. दंगलीतील आरोपींशी त्याचा काहीही संबंध नाही.”
दुमजली इमारत हिम्मतनगरमधील स्थानिक सामाजिक-धार्मिक संघटना अश्रफनगर जमातची आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जमातचे सदस्य कालुमिया शेख म्हणाले की “इमारतीमध्ये सिगारेटचे दुकान, इलेक्ट्रिकल दुरुस्तीचे दुकान आणि किराणा मालाचे दुकान होते. तीन मीटरच्या विस्ताराबाबत पालिकेने 2020 मध्ये आम्हाला नोटीस पाठवली हे खरे आहे. सोमवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी आम्हाला कारवाईची माहिती दिली. आज, आम्ही त्यांना विस्तारित भाग काढण्यास मदत केली.
रामनवमी मिरवणुकीत जातीय संघर्ष
10 एप्रिल रोजी, रामनवमी मिरवणुकीत छापरियामध्ये जातीय संघर्ष झाला, ज्यामुळे दगडफेक, दंगल आणि जाळपोळ झाली, जी तीन-चार तास चालली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे अनेक शेल सोडले आणि 22 जणांना अटक केली. 11 एप्रिल रोजी हिम्मतनगरमधील वंजारवास परिसरात दगडफेकीची घटना घडली होती, त्यानंतर पोलिसांनी या परिसरातून 10 जणांना अटक केली होती.