AFG vs BAN: T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 च्या आजच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने नवीन इतिहास रचला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला परावभ करत T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
सेंट व्हिसेंट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि त्यांना 5 विकेट्सवर केवळ 115 धावा करता आल्या.
पावसामुळे एक षटक कमी केल्यानंतर बांगलादेश संघाला 114 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र बांगलादेश या लक्षाचा पाठलाग करता आला नाही आणि बांगलादेश फक्त 105 धावांवर ऑलआऊट झाली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 115 धावा केल्या. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान सलामीला आले. दोघेही चांगली फलंदाजी करत होते. पण स्फोटक सुरुवात करण्यात अपयशी ठरले.
गुरबाजने 55 चेंडूत 43 धावा केल्या. तर तिकडे झद्रान 15 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अजमतुल्ला जझाईने 10 धावा केल्या. याशिवाय राशिद खानने अखेरीस 10 चेंडूत 19 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रिशाद होसेनने शानदार गोलंदाजी करत एकूण 3 बळी घेतले.