मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन मुंबई क्राईम ब्रॅंचच्या सायबर सेलने बंगळुरु येथून एकास अटक केली. जयसिंह राजपूत असे या आरोपीचे नाव आहे. व्हॉट्स अॅपवर मेसेज करून या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा खूप मोठा चाहता असल्याचा दावा त्याने केला आहे.
आरोपी जयसिंह राजपूत याने ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स अॅपवर मेसेज केला. त्यात त्याने ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे त्यात म्हटले होते.. त्यानंतर त्याने तीन वेळा आदित्य यांना फोनही केला, पण त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. याबाबत ठाकरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा आपण मोठा चाहता असल्याचा दावा आरोपीने केलाय. ठाकरे यांना मेसेज पाठवून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला असता, आरोपीचे लाेकेशन बंगळुरूमध्ये असल्याचे दिसत होते. त्यानुसार, पोलिसांनी बंगळुरु येथे जाऊन आरोपीला जेरबंद केले.. आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक मुंबईला निघाल्याचे सांगण्यात आले..
बापरे.. चीनमध्ये पुन्हा कोरोना..! ‘या’ मोठ्या शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे खरे कारण
अमेरिका आणि चीनच्या वादात पाकिस्तान अडकला; ‘त्यासाठी’ करतोय अमेरिकेची मनधरणी