अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक म्हणजे बड्या नेत्यांना आपले बळ जोखून पाहण्याची संधी असते. या निवडणुकीत प्रत्येकवेळी राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात अशीच थेट लढत होते. यंदाच्या निवडणुकीला मात्र पक्षीय राजकारण चिकटण्याची चिन्हे आहेत. त्याला कारण ठरले आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या इंट्रीचे.
यंदाच्या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत बैठक घेऊन सर्व आजी-माजी आमदारांना एकीचे बळ दाखवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यालाच कोलीत दाखवत काही आजी-माजी आमदारांनी व भाजप नेत्यांनी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला हजेरी लावली.
दुसऱ्याच दिवशी मग शरद पवार जिल्ह्यात असताना त्यांनीही यावर बैठक घेतली. त्यामुळे विखे गटाकडे नेमके कोण शिल्लक राहणार आहेत याचीच चर्चा जिल्ह्यात आहे. मात्र, यानिमित्ताने खासदारकीच्या निवडणुकीच्या प्रमाणेच ही निवडणूक थेट पवार-विखे अशी बनली आहे. मागील निवडणुकीत पवारांनी मुक्काम करूनही नगरची जागा राष्ट्रवादीला मिळू न देण्यात विखेंना यश आलेले होते.
त्यामुळेच जिल्हा बँक निवडणुकीत विखे गटाला राज्यस्तरीय नेत्यांचे बळ मिळाल्यास आणि सर्व आजी-माजी आमदार आणि नेते यांची मोट बांधली गेल्यास पवारांना या निवडणुकीत विखे मोठे आव्हान उभे करू शकतात असेच चित्र आहे. मात्र, ते फ़क़्त फडणवीस यांच्या भूमिकेवर ठरणार आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच