Mumbai : काही दिवसांपूर्वीच अंबुजा (Ambuja) आणि एसीसी (ACC) या दिग्गज सिमेंट कंपन्यांची खरेदी अदानी कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांनी केली. त्यानंतर लगेचच अदानी समूह हा जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचा (Jaiprakash Power Venture Limited) सिमेंट युनिट विकत घेण्याबाबत बोलणी करत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही कंपन्यांची ही बोलणी योग्यरीत्या पार पडल्यास लवकरच या कंपन्यांमध्ये जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा करार होऊ शकतो. दरम्यान, अदानी उद्योगसमूहाने (Adani Group) यावर्षीच सिमेंट क्षेत्रात पाऊल ठेवत अंबुजा आणि एसीसी या दोन कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी केली.
- म्हणून Gautam Adani यांना बसला झटका; पहा कितव्या नंबरवर झालीय घसरण
- Amit Shah in Mumbai: शाह यांनी केले ‘त्याचे’ कौतुक; पहा मुंबई गणपती भेटीमधील क्षणचित्रे
- Fashion Tricks: स्टायलिश दिसायचे तर वाचाचया टिप्स.. लव्हली वुमन म्हणून मिरवा की
- Politics : ‘त्या’ मतदारसंघांसाठी मेगा प्लान तयार.. पहा, निवडणूक विजयाचा भाजपने काय केलाय विचार ?
बंदरांपासून पॉवरपर्यंत (Port to Power) आपला व्यवसाय पसरवणारा अदानी समूह (Adani Group) हा जयप्रकाश असोसिएट्सचा सिमेंट ग्राइंडिंग युनिट (Cement Grinding Unit) आणि इतर लहान मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असून यासाठी अदानी समूह सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च करू शकतो. या आठवड्यात त्याची घोषणा होऊ शकते. मात्र, या करारावर अद्याप चर्चा सुरू आहे. या करारामुळे सिमेंट क्षेत्रातील अदानी समूहाचा दबदबा आणखी वाढण्यास मदत होईल. अदानी समूहाने मे महिन्यातच स्वित्झर्लंडच्या होल्सिम लिमिटेडकडून अंबुजा आणि एसीसी लिमिटेड खरेदी केली होती. यासह अदानी समूह एका रात्रीत भारतातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला. ब्लूमबर्ग (Bloomberg) या वृत्तसंस्थेनुसार हे अधिग्रहण गौतम अदानींच्या सिमेंट कंपनीकडून करण्यात येणार आहे.
जयप्रकाश असोसिएट्सच्या (Jaiprakash Associates) बोर्डाने कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी आपला प्रमुख सिमेंट व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंट ग्राइंडिंगची सुरुवात मध्यप्रदेश (Madhyapradesh) मधील निग्री येथे ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरु झाले. या सिमेंट ग्राइंडिंग सुविधेची क्षमता वर्षाला २ दशलक्ष टन इतकी आहे. सोमवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करण्यात आलेल्या माहितीवरून ही माहिती मिळाली आहे. त्याचवेळी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सने सांगितले की त्यांचे बोर्ड निग्री सिमेंट ग्राइंडिंग युनिटसह इतर नॉन-कोअर मालमत्तेची विक्री करण्याचा विचार करत आहे.
दरम्यान, अदानी समूह आणि जयप्रकाश असोसिएट्सच्या दोन्ही प्रतिनिधींनी या नवीन करारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अदानी समूहाने गेल्या महिन्यातच सांगितले होते की, ते पाच वर्षांत त्यांची सिमेंट उत्पादन क्षमता १४० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. याशिवाय, अदानी समूह आपल्या सिमेंट व्यवसायात २०० अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.